Kolhapur Politics : समरजितसिंह घाटगेंच्या संभाव्य उमेदवारीमुळे सतेज पाटलांची गोची?

Kolhapur Politics, Samarjit Ghatge Satej Patil Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे अस्तित्व संपवण्यासाठी मुश्रीफ-पाटील जोडगळीने जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हातात घेतली.
Samarjit Ghatge, Satej Patil
Samarjit Ghatge, Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 24 August : कागल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 3 सप्टेंबर रोजी या नावावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मात्र घाटगे यांना उमेदवारी मिळाल्यास जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांची गोची निर्माण होणार आहे. अलीकडच्या दहा-पंधरा वर्षात खांद्याला खांदा लावून जिल्ह्याच्या राजकारण आणि सहकारात सक्रिय असणाऱ्या सतेज-हसन यांच्या जोडीला तडा जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्ता बदलानंतर एकमेकांच्या विरोधात ठाकले असले तरी सहकारात अजूनही या दोघांची मैत्री कायम आहे. मात्र, घाटगे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजकारणातील समीकरणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरणार आहे.

मागील 10 ते 15 वर्षाच्या राजकारणात कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिका, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, शेतकरी संघ आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ या जोडगळीने जिल्ह्यात सत्तेचं अस्तित्व निर्माण केलं आहे.

Samarjit Ghatge, Satej Patil
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

स्थानिक स्वराज्य संस्थेसह, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सत्तेची बीजे रुजल्यानंतर गोकुळ दूध संघात एक हाती सत्ता मिळाली. प्रशासक कार्यकाळ सोडला तर मागील दहा वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची आघाडी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे अस्तित्व संपवण्यासाठी या जोडगळीने जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हातात घेतली. या दोघांच्या शिवाय जिल्ह्यातील राजकारणाचे पान हलणार नाही, अशी राजकीय व्यवस्था करून जिल्ह्यात आपला राजकीय दबदबा कायम ठेवला.

अशा परिस्थितीत राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीत गेल्याने काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यात खोडा निर्माण होईल असे चित्र तयार झाले. मात्र सहकारात या दोघांनी आपली मैत्री कायम ठेवली होती.

Samarjit Ghatge, Satej Patil
VIDEO : वाघ यांच्यावरून प्रसाद लाड अन् मेहबूब शेख भिडले; तंगडी तोडायची धमकी अन्...

सहकार वेगळे आणि राजकारण वेगळे अशी या दोघांची भूमिका राहिली. लोकसभा निवडणुकीत दोघांनी एकमेकांवर टीका टाळली. इतकेच नव्हे तर बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत माजी आमदार के.पी. पाटील यांचे पॅनल विजयी केले.

महायुतीत असतानाही या दोघांची दोस्ती चांगली असल्याची अशी चर्चा आता जिल्ह्यात आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे आहे. तर महायुतीचे नेतृत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे.

Samarjit Ghatge, Satej Patil
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

इतकेच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार समरजीत घाटगे असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व म्हणून सतेज पाटील यांना घाटगे यांचा प्रचार करावा लागणार आहे. पाटील यांनी यापूर्वीच जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून सर्वच जागा ताकतीने लढणार. आणि त्या जिंकून येण्यासाठी प्रयत्न करणार असे स्पष्ट केले आहे.

Samarjit Ghatge, Satej Patil
Ramdas Athawale : आता कमळावर लढणार नाही, रामदास आठवलेंच्या 'RPI'ला मिळालं 'हे' नवे चिन्ह

त्यामुळे मुश्रीफ आणि पाटील यांच्या राजकारणातील संघर्षाचा वाद त्यानिमित्ताने सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सतेज पाटील यांची यंत्रणा आत्तापासूनच कागलमध्ये सक्रिय झाली आहे. त्यांच्या इंस्टाग्राम फॅनपेज वरून हसन मुश्रीफ यांचा पराभव किती मतांनी होणार असल्याची पोस्ट व्हायरल होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com