Anil Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याने घेतली शरद पवारांची भेट

Assembly Election 2024 : अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंतांनी पवारांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Sharad Pawar-Anil Sawant
Sharad Pawar-Anil SawantSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 August : शिवसेना नेते तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुण्यातील मोदी बागेत जाऊन भेट घेतली आहे. अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंतांनी पवारांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. पवारांच्या भेटीनंतर सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

माढ्यातील सावंत परिवाराचा भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे आहे. या कारखान्याच्या माध्यमातून अनिल सावंत (Anil Sawant) हे पंढरपूर-मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांत कार्यरत आहेत. याशिवाय स्वतः अनिल सावंत हे पंढरपूर शहरात राहायला असतात, त्यामुळे विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमांतून ते कायम जनतेच्या संपर्कात असतात, त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे भूम परंडा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांचे बंधू शिवाजीराव सावंत हे माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. आता त्यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पंढरपुरातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. आता त्यात अनिल सावंत यांचीही भर पडली आहे. त्यामुळे विधानसभेला पंढरपूरमध्ये चुरस वाढली आहे.

Sharad Pawar-Anil Sawant
Sharad Pawar Politic's : कागलच्या गैबी चौकात शरद पवार करणार एकेकाळच्या पट्टशिष्याचा हिशेब!

पंढरपुरातून भगीरथ भालके हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, तसेच बार्शी येथील कार्यक्रमात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निकटवर्तीयांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता तर खुद्द तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनीही शरद पवारांची भेट घेऊन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे.

अनिल सावंत यांचे काका तानाजी सावंत हे राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री आहेत. या मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे हे आमदार आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटणार हे निश्चित आहे. महायुतीकडून आपल्याला संधी मिळणार नसल्याचे लक्षात घेऊन तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चाचणी सुरू केली आहे.

Sharad Pawar-Anil Sawant
Priyanka Gupta : एकनाथ शिंदेंवर काँग्रेसचा पलटवार; ‘मुलींच्या सुरक्षेसाठी काँग्रेस ते राजकारण करेल’

‘ही भेट विधानसभेची तयारी, असं तुम्ही समजू शकता’

शरद पवारांच्या भेटीसंदर्भात अनिल सावंत म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. भैरवनाथ शुगर फॅक्टरीसंदर्भात मी शरद पवार यांना भेटलो आहे. मी आज पहिल्यांदाच शरद पवारांना भेटलो आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे ही भेट विधानसभेची तयारी आहे, असं तुम्ही समजू शकता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com