Akola city Shiv Sena leader Rajesh Mishra with Eknath Shinde in Nagpur during the official party induction, impacting local municipal politics. Sarkarnama
विदर्भ

Akola Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! महापालिकेतील गटनेत्यासह नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Rajesh Mishra Joins Eknath Shinde's Shivsena : ऐन महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत मिश्रा यांनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. तर दुसरीकडे अकोला महापालिकेतील 8 पैकी 6 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकांत शिवसेनेची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे.

Jagdish Patil

Akola News, 13 Dec : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला महानगरप्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

त्यांच्या या प्रवेशामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. राजेश मिश्रा यांच्यासह चार माजी नगरसेवकांनी नागपूर येथे एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश केला.

प्रवेश केलेल्यांमध्ये राजेश मिश्रा, माजी नगरसेवक अनिता मिश्रा, गजानन चव्हाण आणि प्रमिला गीते यांचा समावेश आहे. शिवाय काही माजी नगरसेवक आणि उपजिल्हाप्रमुख तरुण बगेरे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मात्र, ऐन महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत मिश्रा यांनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. तर दुसरीकडे अकोला महापालिकेतील 8 पैकी 6 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकांत शिवसेनेची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे.

मागील चाळीस वर्षांपासून राजेश मिश्रा यांच्या कुटुंबीय अकोला महापालिकेच्या राजकारणात आहेत. मित्रा यांच्यासह त्यांचे आई-वडील, पत्नी आणि वहिनी अकोला महानगरपालिकेत नगरसेवक राहिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मिश्रा कुटुंबियांचा शिंदेंच्या शिवसेनेला चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT