Bacchu Kadu Vs Ravi Rana sarkarnama
विदर्भ

Ravi Rana News : आमदार रवी राणांनी मौन सोडलं; म्हणाले,'अडसूळ असो की कडू, दोघांचीही भूमिका कटप्पासारखीच...'

Deepak Kulkarni

Amravati News : अमरावती लोकसभा मतदारसंघाची लढत महायुतीने खासकरुन भाजपने प्रतिष्ठेची करताना पूर्ण ताकद लावली होती. 2019च्या निवडणुकीत अपक्ष लढूनही निवडून आलेल्या नवनीत राणांनी संसदेत तसेच महाराष्ट्रात भाजपचा समर्थपणे किल्ला लढवला होता. त्यामुळेच यावेळी भाजपने शिंदे गट आणि बच्चू कडू यांचा प्रखर विरोध पत्करुनही अमरावतीत नवनीत राणा यांना तिकीट दिले होते.पण त्यात राणा यांचा पराभव झाला.यानंतर अमरावतीत राजकीय संघर्ष पेटला असून महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

माजी खासदार व शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी राज्यपाल पदासाठी डावलण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर नाराजी व्यक्त केली होती.तर त्यांचे चिंरजीव अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्याला महायुतीतून बाहेर काढा,आम्हांला दुसरा निर्णय घेण्यास भाग पाडू नका असा थेट इशाराच भाजप नेत्यांना दिला होता. बच्चू कडूंनी तर कायमच राणा दाम्पत्याविरोधात भूमिका घेतली आहे.आता या वादात आमदार रवी राणांनी(Ravi Rana) उडी घेतली असून अडसूळ आणि कडू यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

आमदार रवी राणा यांनी यांनी शनिवारी (ता.10) मीडियाशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत सुरु असलेल्या अडसूळ पिता-पुत्र आणि बच्चू कडू यांच्याकडून सुरू असलेल्या राजकीय आरोप- प्रत्यारोपांवर रवी राणा यांनी मौन धरलं होतं.

पण आता त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा चांगलाच समाचार घेतानाच गंभीर आरोपही केला आहे. अडसूळ आणि कडू यांची भूमिका कटप्पासारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचं म्हटलं आहे.या त्यांच्या आरोपांमुळे अमरावतीत नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

रवी राणा नेमकं काय म्हणाले..?

आमदार रवी राणा यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळ आणि त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.ते म्हणाले, मी महायुतीमधून बाहेर पडायचं की नाही, हे सांगणारे ते कोण? त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो काही आहे तो निर्णय घेतील आणि ठरवतील सुध्दा.मात्र,आपण आजही महायुतीमध्ये आहोत आणि उद्याही राहील असं ठणकावून सांगितलं आहे.

याचवेळी त्यांनी अडसूळ यांना डिवचताना त्यांनीच महायुतीसह मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला जर राज्यपाल पद मिळालं नाही तर मी विचार करेल असं सांगत 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मी अडसूळ यांना आदर सन्मान दिला आहे. पण त्यांनीही एका महिलेबाबत किती पातळी सोडून बोलायचं,याचं भान ठेवलं पाहिजे असंही रवी राणा म्हणाले.

यावेळी त्यांनी आनंदराव अडसूळ यांच्याबाबत मोठा खळबळजनक दावा केला आहे.ते म्हणाले, अडसूळ यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात काम केलं आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू यांनी कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून पाठीत खंजीर खुपसला आहे, असं प्रत्युत्तर आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील आपल्या दोन राजकीय विरोधकांवर केला आहे.

रवी राणा यांनी प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.ते म्हणाले, निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव घेऊन ते राजकारण करत आहे.शेतकऱ्यांबद्दल जर त्यांना जिव्हाळा असता तर 33 महिन्यांच्या सरकारमध्ये त्यांनी का दिवा लावला नाही? कडूंनी जे जे मुद्दे मांडले ते अडीच वर्ष मंत्री होते तेव्हा का मार्गी लावले नाही. त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कोणतं मोठं काम केलं ते त्यांनी सांगण्याचं ओपन चॅलेंजही राणांनी यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT