Eknath shinde and Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Ravikant Tupkar : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवरून रविकांत तुपकरांची मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर टीका, म्हणाले...

Vidharbha Farmers : विदर्भातील तापमानाचा पारा वाढलेला आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ravikant Tupkar Vs CM Shinde : शेतकरी नेते रविकांत तुपकर हे कायमच त्यांच्या विविध कृती आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शेतकरी प्रश्नावर ते सतत आक्रमक भूमिकेत दिसून येतात आता त्यांनी विदर्भातील शेतकीर आत्महत्येच्या मुद्य्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर टीका केली आहे .

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार 'मुख्यमंत्री सत्तेत आल्यावर म्हणाले होते की, आता राज्यात एकही शतेकरी आत्महत्या होणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.' असं रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांनी बुलडाणा येथे म्हटलेलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याचं दिसत नाही. मागील पाच महिन्यात 79 शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं.

दरम्यान वाढत्या तापमानामुळे अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay wadettiwar) यांनी केलेला आहे.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. बी-बियाणे आणि खते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कापसाच्या बियाण्याच्या टंचाईमुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मनस्तापाची वेळ येत आहेत. तापमान वाढल्यामुळे अकोल्यात कलम 144 लागू करण्यात आले होते. मात्र, त्याच रखरखत्या उन्हात बियाणासाठी अकोल्यातील शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT