Cotton Seed Issue : 'वाढत्या तापमानामुळे कलम 144 लावता; त्याच उन्हात शेतकऱ्यांना बियाणांसाठी तासनतास उभे कसे करता?'

Vijay Vadettiwar's Question to Govt : : शेतकरी कपाशीच्या बियाण्यांसाठी धडपड करीत आहेत. वर्षभराच्या गुजराणीचा विषय असल्याने शेतकरी रांगेत उभे राहून बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजारात शेतकऱ्यांना हव्या असलेल्या नेमक्या बियाण्यांचा तुटवडा आहे. तुटवडा असल्याचे सांगून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ दोन पाकिट देण्यात येत आहेत.
Akola News
Akola NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola, 28 May : अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. बि-बियाणे आणि खते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कापसाच्या बियाण्याच्या टंचाईमुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मनस्तापाची वेळ येत आहेत. तापमान वाढल्यामुळे अकोल्यात कलम 144 लागू करण्यात आले होते. मात्र, त्याच रखरखत्या उन्हात बियाणासाठी अकोल्यातील शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola News
Shinde Group Politics: खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

शेतकरी कपाशीच्या बियाण्यांसाठी (cotton seeds) धडपड करीत आहेत. वर्षभराच्या गुजराणीचा विषय असल्याने शेतकरी (Farmer) रांगेत उभे राहून बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजारात शेतकऱ्यांना हव्या असलेल्या नेमक्या बियाण्यांचा तुटवडा आहे. तुटवडा असल्याचे सांगून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ दोन पाकिट देण्यात येत आहेत. दहा-वीस एकराचा शेतकरी या दोन पाकीट बियाण्यांमध्ये पेरणी कशी करणार? असा सवालही विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते म्हणाले, सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेही काढले. तक्रारी करण्यात आल्या. परंतु संवेदनशीलता हरविलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या (Farmers) मागणीची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याची पुरती कल्पना असल्याने आता पोलिस संरक्षणात बियाणे विक्री केली जात आहे.

कंपनीने आता अधिकचा पुरवठा करू शकणार नाही, असे पत्रच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे दुसऱ्या कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले, आम्ही दोन-दोन पक्ष कसे फोडले, गळ्याचा पट्टा कसा काढला, दादा-भाईंवर अन्याय कसा झाला, यासारख्या विषयांवर दिवसभर प्रतिक्रिया देत सुटणारे महायुतीतील नेते शेतकऱ्यांच्या ह्या अवस्थेवर अजूनही गप्प आहेत. सत्तेचे गुऱ्हाळ चालविण्यात व्यस्त आहेत.

Akola News
Ajit Pawar News : "लोकसभा निवडणुकीत काय होईल, हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाहीत," अजित पवारांचं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com