Parbhani Lok Sabha News: परभणीत जानकरांसोबत 'टफ फाईट' झालेल्या संजय जाधवांचा खतरनाक कॉन्फिडन्स; म्हणाले, '...तर उद्धव ठाकरे 'मॅन ऑफ द सिरीज!'

Sanjay Jadhav:"सर्व समाजांनी स्वत:च्या समाजासाठी लढा दिला आहे. समाजाने सरकारला दबावाखाली आणून अनेक गोष्टी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. मग मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी असा प्रयत्न केला तर बिघडण्याचं कारण काय?"
Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Uddhav Thackeray, Sanjay JadhavSarkarnama

Sanjay Jadhav On Lok Sabha Result: महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीसाठीची (lok Sabha Election) धावपळ आता बंद झाली आहे. सर्व राजकीय पक्षांना आता चार जूनच्या निकालाची प्रतीक्षा आहे. तर या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे परभणीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार असून या निवडणुकीत उद्धव ठाकरे 'मॅन ऑफ द सिरीज' असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय जाधव म्हणाले, लोकसभा निवडणुकीची लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी होती. ठाकरेंनी स्वत:च्या कर्तुत्वातून ही लढाई लढली आहे. तसंच शरद पवारांसह (Sharad Pawar) काँग्रेस नेत्यांनीही चांगला प्रचार केला. 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागेल. तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 'मॅन ऑफ द सिरीज' असतील आणि आघाडीच्या किमान 30 ते 35 जागा निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. तसंच महायुतीच्या किती जागा येतील मला माहिती नाही. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच निवडून येईल, हे आत्मविश्वासाने सांगतो, असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Marathwada Political News : स्वातंत्र्यापासून मराठवाड्यातील 'या' मतदारसंघांना लाभल्या नाहीत महिला खासदार!

दरम्यान, यावेळी जाधव (Sanjay Jadhav) यांनी महायुतीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. निवडणुकीमुळे एवढा वाद होण्याचं कारण नाही, राजकारणातील लढाई ही वैचारीक असली पाहिजे, ती जातीवर गेली. भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च मी ओबीसी आहे असं सांगतात. संविधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अशी बोलणं लोकशाहीसाठी घातक आहे."

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Sudhir Mungantivar News : 'एकनाथ शिंदेंचं 'सीएम'पद भाजपमुळेच'... मुनगंटीवारांचा नेमका दावा काय?

यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरही भाष्य केलं. आत्तापर्यंत छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी लढा दिला. महादेव जानकर, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश अण्णा शेंडगे असे नेते ओबीसींसाठी लढले. सर्व समाजांनी स्वत:च्या समाजासाठी लढा दिला आहे. समाजाने सरकारला दबावाखाली आणून अनेक गोष्टी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. मग मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी असा प्रयत्न केला तर बिघडण्याचं कारण काय? वाईट वाटायचं कारण काय? असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला.

परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव यांच्यात लढत झाली. जानकार यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. तर संजय जाधवांसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी चांगली फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता कोणी कितीती विजयाचे दावे केले तरी परभणीची जनता कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ घालणार हे येत्या चार जूनलाच जाहीर होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com