Abu Azmi-Sanjay Gaikwad Sarkarnama
विदर्भ

Sanjay Gaikwad On Abu Azmi : संजय गायकवाड अबू आझमींवर संतापले; म्हणाले, ‘आझमींचे थोबाड ठेचले पाहिजे...’

Controversial Statements About Palkhi : वारकरी सांप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांकडून नेहमीचे शिस्तीचे दर्शन घडविले जाते. पालखीसंदर्भात वादग्रस्त विधान करून मुस्लिमांकडून द्वेष केला जातो, हे दाखवून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा अबू आझमींचा प्रयत्न असतो.

Vijaykumar Dudhale

Buldhana, 23 June : पालखीमुळे रस्ते जाम होतात. मुस्लिमांनी कधीही तक्रार केली नाही. पण, रस्त्यावर दहा मिनिटांसाठी नमाजपठण करण्यास मात्र विरोध केला जातो, असे वाद्‌ग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून राजकीय वादंग उठले आहे. पालखीसंदर्भात वाद्‌ग्रस्त विधान करणाऱ्या आझमींचे थोबाड ठेचले पाहिजे, अशी संतप्त भावना शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूरच्या दौऱ्यावर असताना अबू आझमी (Abu Azmi) यांनी पालख्यासंदर्भात वाद्‌ग्रस्त विधान केले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून आझमींचा खरपूस शब्दांत समाचार घेण्यात येत आहे. आमदार गायकवाड म्हणाले, वारकरी सांप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांकडून नेहमीचे शिस्तीचे दर्शन घडविले जाते.

पालखीसंदर्भात वादग्रस्त विधान करून मुस्लिमांकडून द्वेष केला जातो, हे दाखवून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा अबू आझमींचा प्रयत्न असतो. वारकरी आणि पालख्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही.

वारकरी रस्त्यांनी नाही तर काय हवेत उडून जाणार, असा सवाल करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांचे थोबाड ठेचले पाहिजे, अशी संतप्त भावना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी व्यक्त केली आहे.

अबू आझमी काय म्हणाले होते?

मी आज (ता. २२ जून) पुण्याहून सकाळी लवकर येत होतो. त्यावेळी मला काही लोकांनी सांगितले की, पालखी जाणार आहे, त्यामुळे लवकर जावा नाही, तर रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतो आहे. पण, आम्ही कधीही त्याबाबत तक्रार केलेली नाही, असे विधान आमदार अबू आझमी यांनी केले होते.

आम्ही कोणाचीही तक्रार करणार नाही. आम्ही हिंदूंबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो. पण, आज एकाही मुस्लिमाने तक्रार केली नाही की, रस्त्यावर सण का साजरे केले जातात. नमाजावेळी काही मशिदी भरल्या तर काही लोक नमाजासाठी पाच ते दहा मिनिटांसाठी रस्त्यावर येतात. पण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आादित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाजपठण केले, तर त्या व्यक्तीचा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायन्सस रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांचेही सडेतोड उत्तर

अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले, अबू आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याचा शौक आहे. कारण, त्यांना असं वाटतंय की वाद्‌ग्रस्त विधाने केल्यानंतर प्रसिद्धी जास्त मिळते. मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, त्यामुळे अशा फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT