Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘साहेबां’पुढं अश्रू गाळणाऱ्या, विनवण्या करणाऱ्या नेत्यांनीच संधी मिळताच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा दुटप्पी लोकांचे मनसुबे कधीही फळाला येणार नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘दादा’ गटातील नेत्यांना फटकारले.
आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं देशमुख सध्या विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करीत आहेत. शुक्रवारी (ता. 1) त्यांनी चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Sharad Pawar Groups Leader Anil Deshmukh Slams Ajit Pawar Group At Chandrapur For Treachery With NCP Chief)
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यावेळी अनेक नेत्यांनी हात जोडत, पाया पडत, डोळ्यांत पाणी आणत ‘साहेबांना’ राजीनामा परत घ्या अशी विनवणी केली. हे नेते कोण आहेत हे आपल्याला माहिती आहे. हीच मंडळी आता वेगवेगळी वक्तव्य करीत लोकांची दिशाभूल करीत आहे. हा प्रकार म्हणजे एखाद्या ‘प्रोफेशनल’ ढोंग्यालाही लाजवेल असाच आहे, असं देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा फुटला तेव्हा अनिल देशमुख हे अजित पवार गटाकडं येणार होते. परंतु त्यांना मंत्रिपद हवं होतं. मात्र, सहकारी भाजपकडून देशमुखांना मंत्रिपद देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळेच देशमुख अजितदादांसोबत आले नाहीत, असं काही जण सांगत आहेत. दादांनी (Ajit Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सांगितलं होतं की, हवं ते मंत्रीपद घ्या, पण आमच्यासोबत या. त्यावेळी आपण प्रफुल्ल पटेलांना ठणकावून सांगितल होत की, आपण पवार साहेबांना सोडणार नाही. आपल्या मनाप्रमाणं खातं आपल्याला मिळणार होतं, तरी हा मोह आपण केला नाही, असं देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षातील अनेक जण शरद पवार यांच्याकडे गेले होते. तेव्हा भाजपसोबत जाण्याचा विषय चर्चेत आला. पवारांनी असा कोणताही निर्णय घेऊ नका, असं त्यांना ठणकावून सांगितलं होतं. आपण किंवा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्याची भूमिका घेणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं होतं, असं देशमुख यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडं सध्या लोकसभेच्या चार जागा आहेत. आगामी निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.