Shivsena Sarkarnama
विदर्भ

Shivsena News: शिवसेनेचा महापालिकेसाठी तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरला? इच्छुकांचं टेन्शन वाढलं;'हा' मोठा टास्क असणार समोर

Nagpur Municipal Corporation Election : शिवसेना एकसंध असताना भाजपसोबत युती होईल याची भरोशावर शिवसेना होती. उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेने वाट बघितली. शेवटी युती तुटली. त्यामुळे तत्कालीन जिल्हाप्रमुखांची धावपळ झाली होती.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला तिकीट द्यायचे, कुठल्या प्रभागात लढायचे याचा फॉर्म्युला शिवसेनेने जवळपास ठरवला आहे. ज्यांना कोणाला निवडणूक लढायची आहे त्यांनी आधी आपल्या प्रभागात तीन महिने काम करावे, त्याचा रिपोर्ट सादर करावा. त्यानंतर तिकीट वाटपावेळी विचार केला जाईल, असे सर्वांना निक्षून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वेळेवर यायचे, तिकीट घ्यायचे आणि पराभव झाल्यावर गायब व्हायचे, हे आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत चालणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी नागपूरचे संपर्क मंत्री म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची शिवसेनेने नियुक्ती केली आहे. त्यांच्या उपस्थितीत आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक रविभवन येथे घेण्यात आली. यावेळी महापालिकेच्या निवडणुकीबाबत सर्वांचे मत जाणून घेण्यात आले.

नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत युती होईल याची शाश्वती नसल्याचे अनेकांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच किमान शंभर जागांवर तयारी सुरू करावी लागले.

2017 च्या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) एकसंध असताना भाजपसोबत युती होईल याची भरोशावर शिवसेना होती. उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेने वाट बघितली. शेवटी युती तुटली. त्यामुळे तत्कालीन जिल्हाप्रमुखांची धावपळ झाली होती. जो भेटेल त्या उमेदवाराच्या हातात शिवसेनेचा एबी फॉर्म द्यावा लागला होता.

दुसरीकडे जे सक्षम उमेदवार होते त्यांच्यापर्यंत घाईगडबडीत एबी फॉर्म पोचलाच नाही. शेवटच्या टप्‍यात जबरस्तीने अनेकांना हातात जबरदस्ती एबी फॉर्म कोंबावा लागला. याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. त्यांचे दोनच नगरसेवक निवडून आले. या अनुभवातून शिवसेनेने धडा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

युती होईल तेव्हा होईल. वरिष्ठ जे काही ठरवतील ते त्यांना ठरवू द्या. युती झाली तर जेवढ्या जागा वाट्याला येतील तेवढ्या लढायचा. मात्र झाली नाही तर उद्या धावपळ नको याकरिता आत्तापासूनच इच्छुकांनी कामाला लागावे असे निर्देश या बैठकीत आशिष जयस्वाल यांनी दिले.

मागील निवडणुकीत शिवसेनेचे सुमारे 25 उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. चारच्या प्रभागात त्याच्यासोबत तेवढ्याच क्षमतेचे उमेदवार असते दोन ऐवजी शिवसेनेचे २० नगरसेवक महापालिकेत असते. प्रभागाचे समीकरण आणि गणित लक्षात घेऊन आपआपली तयारी सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

शिवसेना सत्तेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जनमानसात इमेज आहे. त्यामुळे आत्तापासूनच मतदारांसोबत संपर्क सुरू करा. त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या. आपला प्रभाव वाढवा असे इच्छुकांना यावेळी सांगण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख सुरज गोजे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT