
Mumbai, 30 August : मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून (ता. 29 ऑगस्ट) मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू केली आहे. जरांगे यांच्यासोबत मराठेही मोठ्या संख्येने आझाद मैदानात हजर आहेत, त्यामुळे राजधानीमध्येच जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्याने सरकारवर दबाव वाढत आहे. आज सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेली होती. मात्र, आरक्षणासंदर्भात जरांगेंनी सरकारला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. मात्र, खुद्द माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचे त्यांच्या तोंडावरच जाहीरपणे कौतुक केले आहे.
मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांना माजी न्यायमूर्ती शिंदे व आणि इतर सदस्य आझाद मैदानावर गेले होते. या शिष्टमंडळाने आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, अशी मागणी केली. त्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. मात्र, तो नकार देताना जरांगेंनी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचे कौतुक केले आहे.
ते म्हणाले, आम्ही शिंदे समितीवर (Shinde committee) खुश आहोत. आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही. तुम्हाला आम्ही बोलत नाही. हे (सरकार) चबारे सांगतात, तसं तुम्हाला बोलावं लागतं. अहवाल नसतानाही परवा २९ जातींना आरक्षण दिलं गेलं. येत्या शनिवारी आणि रविवारी हे झालं नाही तर राज्यातील एकही मराठा मुलाबाळांसह घरी राहणार नाही. तुमच्या हातात आणखी सहा ते सात दिवस आहेत.
माजी न्यायमूर्ती शिंदे समितीने गोरगरिबांमध्ये नाव कमावलं आहे. शिंदे समितीने मराठ्यांच्या लाखो नोंदी शोधल्या आहेत, त्यामुळे शिंदे समितीने लाखो मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शिंदे समितीने मराठ्यांमध्ये नाव कमविले आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मराठे माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला माघारी (वेडेवाकडे) बोलत नाहीत, त्यामुळे शिंदे समितीला आमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी पाठविले जाते. त्यांना (सरकारला) इकडे यायला थोबाडच नाही, अशी टीकाही नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी ‘सरकार’च्या प्रमुखांवर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.