uddhav thackeray Sunil Kedar  sarkarnama
विदर्भ

Shivsena UBT : काँग्रेसचा दावा असलेले मतदारसंघ ठाकरेंकडे? शिवसेनेच्या बैठकीत सुनील केदार उपस्थित

Shivsena UBT Congress Sunil Kedar uddhav thackeray : शिवसेना (यूबीटी) रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता. त्या बदल्यात ग्रामीणमधील दोन आणि शहरातील एका विधानसभा मतदारसंघाची मागणी करण्यात आली.

Rajesh Charpe

Shivsena UBT News : उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नागपुरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

नागपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर या बैठकीच चर्चा झाली असून शहरातील दक्षिण नागपूर आणि ग्रामीणमधील कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्यास या बैठकीत संमती झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

शिवसेना (यूबीटी) रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता. त्या बदल्यात ग्रामीणमधील दोन आणि शहरातील एका विधानसभा मतदारसंघाची मागणी करण्यात आली. रामटेक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्याची सर्वांची संमती आहे. मात्र दुसऱ्या मतदारसंघाविषयी अडचण होती.

युतीमध्ये शिवसेना काटोल विधानसभा मतदारसंघात लढत होती. मात्र अनिल देशमुख महाविकास आघाडीत आहेत. हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने कामठी विधानसभेवर सर्वांनी भर दिला. ग्रामीणचे राजकरण सुनील केदार यांच्या भोवती फिरते. त्यांच्या पाठींब्या शिवाय उमेदवार येथे निवडून येणे अवघड आहे. त्यांची संमती घेण्यासाठी केदारांनाही बैठकीला बोलावण्यात आल्याचे कळते.

नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. नागपूरमध्ये प्रमुख नेत्यांच्या झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे यांनी सर्व सहा जागा काँग्रेसला देण्याची मागणी केली होती. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले होते. नागपूरमध्ये कुठली जागा लढायची याबाबतही शिवसेनेत (यूबीटी) मतभेद होते.

दक्षिण नागपूर ठाकरेंकडे

दक्षिण आणि पूर्व नागपूर हे दोन मतदारसंघ स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागितले होते. मध्य नागपूरचे जातीय समीकरण महाविकास आघाडीला पोषक असल्याने मध्य नागपूर मागावे, अशी मागणी पदाधिकाऱ्याकांडून करण्यात आली होती. पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनीसुद्धा आम्ही तीन मतदारसंघ मागणार असल्याचे सांगितले होते. यात मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या समवेत रविवारी झालेल्या बैठकीत दक्षिण नागपूर निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.

काँग्रेसमधील इच्छुक नाराज?

दक्षिण नागपूर मतदारसंघ शिवसेनेसाठी (यूबीटी) सोडण्यास विकास ठाकरे यांनी होकार दिला की नाही हे समजू शकले नाही. मात्र त्यांची संमती घेतली असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. विशेष म्हणजे दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि काँग्रेसच्या मीडया सेलचे प्रमुख विशाल मुत्तेमवार हे इच्छुक आहेत. पांडव मागील निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांच्या फरकांनी पराभूत झाले होते.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT