MLA Sanjay Gaikwad & MP Sanjay Raut. Google
विदर्भ

Sanjay Gaikwad News : "तुम्हाला पदराखाली घेतलं..", शिवसेना आमदाराकडून संजय राऊत टार्गेट

Sanjay Raut Shivsena :शिंदेंची शिवसेना हीच मुळ शिवसेना असल्याचा निकालाची करून दिली आठवण

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत रोज एकनाथ शिंदे आणि फुटलेल्या आमदारांवर टीका करतात. त्यांच्या या टीकेला बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी चोख प्रत्युउत्तर देताना संजय राऊत यांची अक्कलच काढली. शिवाय शिंदेंची शिवसेना हीच मुळ शिवसेना असल्याचे आठवण सुद्धा गायकवाड यांनी करून दिली.

"संजय राऊतला (sanjay Raut) अक्कल पाहिजे की आमचा मान्यता प्राप्त शिवसेना पक्ष आहे गट नाही. आम्हाला कुणाला विलीन व्हायची गरज नाही आणि 1989 ला बाळासाहेब ठाकरेजी आणि अटलजींनी शिवसेना-भाजपची युती केली होती. तर, मग तुम्ही तेव्हा पासून त्याच्या पदरा खाली होते." अशा शेलक्या शब्दांत संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमची घटना स्वतंत्र आहे. आमचा विचार स्वतंत्र आहे, असेही संजय गायकवाड म्हणाले.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. बाबरी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी पाडली. राम मंदिरासाठी आंदोलनं झाली. बलिदान, त्याग करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा भारतीयांसाठी दिलासा आहे. त्यावर मोठ्या डौलाने राम मंदिर उभे राहत असल्याचे संजय गायकवाड म्हणाले.

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रणाची गरज काय, प्रभू राम तिथे नव्हते तेव्हा तुम्ही तीन वेळा अयोध्येला गेले ना. मग आता का जात नाही जायला पाहिजे. सत्तेला घाबरून कोण पळून गेलं, हे जनतेने पाहिले आहे. सत्ता जनतेसाठी असते आणि गेल्या 76 वर्षात जितके कामे झाली नाहीत ते एकनाथ शिंदे यांनी केली, असा टोला देखील संजय गायकावाड यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT