Pramod Jatar,uday samant, vinayak raut
Pramod Jatar,uday samant, vinayak rautsarkarnama

Pramod Jatar News : बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, रिफायनरी प्रकल्पावरून भाजप नेत्याचा घरचा आहेर

Political News : रिफायनरीवरून आक्रमक भूमिका, जागा दाखवा अन्यथा प्रकल्प संपवा...
Published on

Ratnagiri : कोकणात राजापूर येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प प्रकल्प विरोधात भव्य मोर्चे निघाले, मोठे रणकंदन माजले होते. या प्रकल्पाला शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाने जोरदार विरोध केला आहे. त्यातच या प्रस्तावित प्रकल्पासाठी सात ते आठ महिन्यांपूर्वी माती परीक्षण झालं मात्र आता त्याचा अहवाल आल्यानंतर या प्रकल्पाचे भवितव्य ठरेल अशी भूमिका पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अनेकदा मांडली आहे. अशातच आता भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे माजी आमदार व भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

Pramod Jatar,uday samant, vinayak raut
Loksabha Elecction : मोठी बातमी !लोकसभेसाठी महायुतीचा 'हा' फॉर्म्युला ठरला?

माझा रोकडा सवाल आहे आमच्या सरकारच्या उद्योगमंत्र्याला, येथील पालकमंत्री उदय सामंत यांना.आमच्या सरकारला...अशी आक्रमक भूमिका घेत प्रकल्पाच्या जागांचे रेट जाहीर करा. लोकांनी जागा दिली तर प्रकल्प होईल अन्यथा प्रकल्पाला जे जागा देतील तिकडे निघून जाईल. दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल, असा माझा रोकडा सवाल माझ्याच सरकारला आहे, अशी रोखठोक भूमिका प्रमोद जठार यांनी राजापूर येथे मांडली आहे.

येथील 2024 ची निवडणूक ही रोजगाराच्या मुद्द्यावर लढली जावी अशी आपली भूमिका असून खासदार विनायक राऊत यांनी मांडली. त्यांच्यावर देखील जठार यांनी टीका केली. आजपर्यंत किती जणांना रोजगार दिला आहे? ते जाहीर करावं असं आव्हान जठार यांनी राऊत यांना दिलं.

रोजगाराची हमी म्हणजे राजापुरात येणारी रिफायनरी आणि म्हणून आमचा आटापिटा चालू आहे. रोजगार हाच भाजपाचा मुख्य मुद्दा निवडणुकीच्या रणांगणातला आहे असेही प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे आता पाणी परीक्षण, माती परीक्षण, हवा परीक्षण आता बास झालं जागांचे रेट जाहीर करा लोकांनी जागा दिली तर प्रकल्प होईल, लोकांनी जागा दिली नाही तर प्रकल्प होणार नाही अन्यथा होणार नाही.

बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला, जागा दाखवा नाहीतर प्रकल्प संपवा यासाठी प्रकल्पाच्या जागांचे रेट जाहीर करा. असं आपलं सरकारला सांगण आहे अशी जाहीर भूमिका भाजपाचे प्रमोद जठार यांनी घेतली आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 2100 गाव आहेत. या गावागावातील प्रत्येक 50 ते 100 मुलांना रोजगार देण्यात माझे नेते यशस्वी होऊ शकले तर विकासाची गंगा दूर नाही. 3 लाख कोटी रुपयांची रिफायनरी प्रकल्प येत आहे. यामध्ये दोन लाख तरुणांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार उपलब्ध होणार आहे हे अर्थ विकासाचे चक्र आहे असं सांगत रिफायनरी बाबत आपली भूमिका मांडली आहे.

Pramod Jatar,uday samant, vinayak raut
Sangali BJP News : राम मंदिर नको, शौचालय बांधा म्हणणार्‍या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेलेत... सुधीर मुनगंटीवारांची जहरी टीका

रिफायनरी प्रकल्प हा नाणार, बारसू, सावंतवाडी, विजयदुर्ग अन्यथा लोटे परशुराम कोणत्याही ठिकाणी जे दहा हजार एकर जागा देतील तिकडे हा प्रकल्प होईल नाहीतर होणार नाही. आपण या सरकारमधील घटक असलो तरी आपल्या मुलांना लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ही अशी आपली भूमिका आहे. कोकणातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणं महत्त्वाचं आहे येथील गाव मुंबई पुण्याकडे चालली आहेत, अशी खंत जठार यांनी व्यक्त केली. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचे आपण काम करणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited By Roshan More)

Pramod Jatar,uday samant, vinayak raut
Raghav Chadha : धनखड यांचा ‘आप’ला दणका; नेतेपदी राघव चड्ढांच्या नियुक्तीची विनंती फेटाळली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com