Nandurbar Shivsena politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या असंतुष्ट आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न होत आहेत. आता नंदूरबारचा एक एक विधान परिषद सदस्य शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून औरंगाबादमध्ये शिवसेना ठाकरे गटात चांगलेच राजकारण रंगले आहे. ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे नाराज झालेले आणि खैरे यांचे विरोधक तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार अशी चर्चा सुरू झाली होती.
अंबादास दानवे पक्ष सोडण्याची शक्यता असल्याने ठाकरे गट सावध झाला होता. यासंदर्भात माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनोदी पक्षनेते अंबादास दानवे आणि अन्य नेत्यांची मुंबईत बैठक झाली. शिवसेना ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर त्यावर तोडगा काढला आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे समाधान झाल्याचे बोलले जाते.
या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दानवे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असतानाच आता नंदूरबार येथील एक आदिवासी आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच या आमदाराने आपल्या विश्वासू सहकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी चाचणी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे कट्ट्याच्या निरीक्षकांना स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे सावध झालेल्या निरीक्षकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबतची कल्पना दिल्याचे कळते.
शिवसेना ठाकरे गटांनी विधान परिषदेवर संधी दिल्याने या आमदाराच्या निष्ठेबाबत व त्यांची नियुक्ती झाल्याने अनेक स्थानिक नेत्यांना धक्का बसला होता. या आमदाराचे आदिवासी विकासमंत्री विकास गावित यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे बोलले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नंदूरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संबंधित आमदारांनी मंत्री गावित त्यांना पडद्यामागून मदत केली होती. त्या बदल्यात या आमदाराच्या मुलाला जिल्हा परिषदेत सभापती करण्यात आल्याचे बोलले जाते. या ऋणानुबंधातूनच संबंधित आमदार आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची तयारी करीत असल्याचे बोलले जाते.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.