Nagpur News : काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रपतींनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केलेल्या अभिभाषणावर सोनिया गांधींनी मुर्मू भाषण करताना थकल्या होत्या, असे वक्तव्य केले. यावरुन भाजपकडून गांधी यांच्यावर टीका करत असताना आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील सोनिया गांधी यांना फटकारले.
नागपुरात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती पदाचा अपमान केला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे संबोधित करणे केवळ त्या व्यक्तीचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अनादर आहे, सोनिया गांधींनी देशाची माफी मागावी', अशी मागणी मुख्यमंत्री सावंत यांनी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला 'प्रेमपत्र' म्हणून टीका करणाऱ्या खासदार पप्पू यादव यांचाही समाचार सावंत (Pramod Sawant) यांनी घेतला. पप्पू यादव यासारख्या लोकांना लोकशाही कळत नाही. आज 75 वर्षे पूर्ण झालेल्या संविधानाच्या आधारे आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत जातो. या लोकांनी काही बोलताना संविधानाचा आदर करावा, असे सावंत म्हणाले.
गेल्या 10 वर्षांत दिल्लीतील नागरिकांना खरे-खोटे यातला फरक कळाला आहे. यावेळी दिल्लीत 100 टक्के भारतीय जनता पक्षाचे 'डबल इंजिन' सरकार सत्तेवर येईल. दिल्लीतील जनतेलाही मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला विकास हवा आहे, असे सावंतांनी मत मांडले.
'महाकुंभ हे सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे, तेथे झालेल्या अपघाताने मला दु:ख झाले आहे. असे व्हायला नको होते, तरीही हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आलाय. मी सर्वांना या महाकुंभात सहभागी होऊन, पवित्र स्नान करण्याचे आवाहन करतो', असेही सावंत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.