Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे का म्हणाले, "भाजप माझ्यासाठी लकी नाही"

Manikrao Kokate; agriculture minister Kokate stated, BJP is not lucky for me-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नाशिक मध्ये झाला सर्वपक्षीय सत्कार
Manikrao Kokate
Manikrao Kokatesarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज शहरात सर्वपक्षीय नागरिक सत्कार झाला. यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांनी आपला राजकीय प्रवास मांडला. यावेळी विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले, राजकारणाशी माझा संबंध नव्हता. शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र आणि भूगोल या विषयात मला मार्क्स मिळायचे नाहीत. काँग्रेसचे पदाधिकारी (कै) सुरेश शर्मा यांच्यामुळे मी राजकारणात आलो. काँग्रेस पक्षात सक्रिय झालो असे त्यांनी सांगितले.

Manikrao Kokate
Womens Politics: आमदार, खासदार नव्हे; महिला सरपंच करणार गरजूंना मानधनातून ‘ही’ मोठी मदत!

मी राजकारणात प्रदीर्घकाळ वनवास भोगला आहे. काँग्रेस पक्षातून माझी कारकीर्द सुरू झाली. लोकांची कामे करण्यात मला रस होता. माणसे जोडण्यातही रस होता. त्यामुळे अनेक क्षेत्रातील लोक माझे मित्र आहेत. हे मित्र आजही माझ्यावर प्रेम करतात असे त्यांनी सांगितले.

Manikrao Kokate
Kirit Somaiya Politics: मालेगावात सोमय्यांचा इव्हेंट; एकीकडे गो बॅक, दुसरीकडे पुष्पवर्षाव!

पूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार होता. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली की माणूस निवडून यायचा. काँग्रेसचे (कै) खासदार मुरलीधर माने यांच्या संपर्कात आलो आणि पुढे जात राहिलो. या कालावधीत सुरेश कलमाडी यांच्याशी मी संघर्ष केला असल्याचे त्यांनी सांगितले.

आता माझे सर्व पक्ष फिरून झाले आहेत. मात्र माझे सर्व मित्र आजही माझ्यासोबत आहेत, असेही ते मिश्किलपणे म्हणाले. (कै)गोपाळराव गुळवे यांच्यासोबत मी पंचायत समितीत काम केले. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील विविध सहकारी आणि नेत्यांचा आवर्जून उल्लेख केला.

कृषिमंत्री कोकाटे यांनी यावेळी आपल्या मनातील सल बोलून दाखविली. ते म्हणाले, पूर्वी काँग्रेस पक्षाची जशी स्थिती होती, तशी सध्या भाजपची स्थिती आहे. भाजपची उमेदवारी मिळाली की, माणूस निवडून येतो. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह सर्वजण निवडून आले. मी मात्र पराभूत झालो. त्यामुळे भाजप हा माझ्यासाठी लकी ठरला नाही.

राजकारणात गेली 28 वर्ष मी वनवास भोगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा वनवास दूर केला. सकाळी राजकारण हे चांगले आहे असे सगळेच म्हणतात. हीच मंडळी रात्री मात्र राजकारण वाईट आहे असे सांगतात असा चिमटा ही त्यांनी घेतला.

ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे अध्यक्षस्थानी होते. अॅड जयंत जायभावे, यशवंत सिंग, वसंतराव मुळाणे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी (भाजप), अनिल चौगुले, रंजन ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, नंदू बनकर आदींनी मंत्री कोकाटे यांचा सत्कार केला,

-------

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com