Eknath Shinde Shivsena : 'ऑपरेशन टायगर' सुरू? माजी आमदार धंगेकर, बाबर, मोकाटे शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार..?

Shivsena Political News : उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणणार असल्याची चर्चा आहे. यात काँग्रेस,उद्धव ठाकरे शिवसेना, मनसे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे तब्बल 25 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती बाबर यांनी यावेळी दिली आहे.
Eknath Shinde Mahadev Babar Ravindra Dhangekar Chandrakant Mokate .jpg
Eknath Shinde Mahadev Babar Ravindra Dhangekar Chandrakant Mokate .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई,पुणे महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे. महायुतीतील भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता कट्टर समर्थक असलेल्या महादेव बाबर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी गुरुवारी (ता.30) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांचा शिवसेनेतील (Shivsena) प्रवेश निश्चित मानला जात आहे. हा आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणणार असल्याची चर्चा आहे. यात काँग्रेस,उद्धव ठाकरे शिवसेना, मनसे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे तब्बल 25 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती बाबर यांनी यावेळी दिली आहे. त्यामुळे हा निश्चित शिंदेंसाठी मोठं इनकमिंग मानलं जात आहे.

Eknath Shinde Mahadev Babar Ravindra Dhangekar Chandrakant Mokate .jpg
NCP vs Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका जिव्हारी; अजितदादांचा लाडका आमदार म्हणाला, ' त्यांनीही पहाटे 5 वाजल्यापासून...'

महादेव बाबर यांचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. बाबर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची पुण्यातील विशेषत: हडपसर परिसरात त्यांचं मोठं राजकीय वर्चस्व राहिलं आहे.त्यामुळे तिथे शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

माजी आमदार असलेल्या महादेव बाबरांनी हडपसर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. ते तेथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र,महाविकास आघाडीत ही जागा विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली.त्यामुळे बाबरांना माघार घेण्याखेरीज गंत्यंतर राहिली नाही.

Eknath Shinde Mahadev Babar Ravindra Dhangekar Chandrakant Mokate .jpg
Ravindra Dhangekar News : पुण्यात काँग्रेसला लवकरच मोठा धक्का..? कसब्यातील पराभवानंतर नाराज धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत...

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाल्यानंतर अनेक काठावरच्या नेत्यांनी महायुतीतील भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे.आगामी महापालिका निवडणुकीसाठी भरभक्कम राजकीय पर्याय शोधण्यासाठी ही नेतेमंडळी प्रयत्नशील आहे.

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या ताब्यातून कसबा खेचून आणत मोठं यश मिळवलं होतं. त्यामुळे त्यांची पुणेच नव्हे तर राज्य पातळीवर चर्चा झाली होती.त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली. पण भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी त्यांना धोबीपछाड दिला. त्यानंतर भाजपच्या हेमंत रासनेंनी विधानसभा निवडणुकीतही धंगेकरांचा पराभव केला. या पराभवानंतर आता धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.

Eknath Shinde Mahadev Babar Ravindra Dhangekar Chandrakant Mokate .jpg
Raju Khare : ‘चुकून मला तुतारी हाती घ्यावी लागली’; राजू खरेंचे पुन्हा धक्कादायक विधान, पवारांच्या पक्षात मन रमेना!

काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुरुवारी (ता.30) भेट घेतली आहे. यामुळे धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com