Prakash Ambedkar, Chhagan Bhujbal Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : '...तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा!'; आंबेडकर असं का म्हणाले?

जयेश विनायकराव गावंडे

Washim News : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल एक विधान केले आहे. मराठा आरक्षणावरून त्यांनी हे विधान केले आहे. भुजबळांनी सार्वजनिकपणे भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडावे. जर कॅबिनेटमध्ये त्यांचं ऐकलं जात नसेल तर ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, असा सल्ला आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे. आंबेडकर हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात असतांना बोलत होते.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात सोमवारी (ता.29) बोलत होते. ते म्हणाले, भुजबळांचे त्यांच्याच सरकारमध्ये ऐकले जात नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. म्हणजेच त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल. नाहीतर एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं या दोन गोष्टी एकत्र कशा राहतील? असा सवाल देखील केला.

आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे मराठा समाजाचे सध्या सर्वात टॉलेस्ट नेते झालेत. आणि त्यांच्या सिक्सरमुळे इतर मराठा नेते क्लिन बोल्ड आऊट झाले आहेत. तर भाजप आणि शिंदेंचा खेळ होता की,भाजपने ओबीसीला (OBC) गोंजारत ठेवायचं आणि एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबरोबर बोलायचं, असेही आंबेडकर म्हणाले.

भारतीय जनता पार्टी ओबीसीला विश्वास देत होता आम्ही कोणत्या परिस्थिती धक्का लागू देणार नाही व ओबीसींची भावना आता अशी झाली की आम्हाला धक्का लागला आणि भारतीय जनता पक्षाने आम्हाला फसवलं त्यामुळे त्यांचेही विकेट बोल्ड आऊट झाली. असा टोलाही आंबेडकर यांनी भाजपला लगावला. यामध्ये सर्वात मोठा भाजपचा लॉस झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वंचित सोबत असलेल्या युवतीबाबत उघडपणे का बोलत नाहीत असे प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ,उद्धव ठाकरे कोणाला घाबरतात माहिती नाही. मी जे काही ठरले ते जाहीर केले. ते पत्रं आली, तेही जाहीर केले. मात्र, त्यांचे प्रवक्ते यांनीही स्पष्ट केले आमच्यासाठी ते ठीक आहे ,येत्या निवडणुकीत दोघेसोबत असू हे जरी निश्चित असले तरी, उद्या काय होते हे कोणाला माहिती ? असेही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT