Dharashiv Loksabha News : धाराशिवमधून ठाकरेंच्या 'वाघा'शी महायुतीचा कोणता 'सिंह' झुंजणार?

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : मोदींच्या नावाचा करिष्मा अजूनही कायम आहे. ठाकरेंची शिवसेना चिन्हासह शिंदेंनी काबीज केली आहे.
Dharashiv Lok Sabha Constituency
Dharashiv Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे सूत्र जवळपास अंतिम होत आले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे यांचा गढ सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे दौरे मागील काही काळात वाढले आहेत. त्यामुळे भाजपाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर लोकसभा लढविण्याची जबाबदारी पडणार की, प्रवीणसिंह परदेशी ओमराजेंशी भिडणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पारावरील गावगप्पांमध्ये कोणत्या सिंहाला महायुती उमेदवारी देणार? याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 2009 मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांचा सहा हजार 787 मतांनी पराभव केला. धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून पहिला सिंह लोकसभेत दाखल झाला. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा बोलबाला सुरु होता.

Dharashiv Lok Sabha Constituency
MP Omraje Nimbalkar News : मंत्री सावंतांच्या सुरात राष्ट्रवादीच्या बिराजदारांचे सूर; खासदार ओमराजेंना विचारला जाब...

मोदी लाटेत शिवसेनेचा वाघ पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या सिंहासोबत भिडला. रवींद्र गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीत 54 टक्के मते घेत तब्बल दोन लाख 35 हजार मतांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला. 2009 मध्ये 44 टक्के मतदान घेतलेल्या राष्ट्रवादीला मोदी लाटेत केवळ 33 टक्के मतदानावर समाधान मानावे लागले. नॉट रिचेबल या शिक्क्यामुळे रवींद्र गायकवाड यांना डावलून विधानसभेत सिंहाकडून पराभूत झालेल्या वाघावर राष्ट्रवादीच्या सिंहासोबत लढण्याची जबाबदारी शिवसेनेने सोपवली.

पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि राणाजगजितसिंह पाटील हे एकमेकांना भिडले. मागील निवडणुकीत केवळ 33 टक्के मतदान मिळालेल्या राष्ट्रवादीला 39 टक्के मतदान मिळवून देण्यात राणाजगजितसिंह पाटील यशस्वी झाले. शिवसेनेच्या वाघाकडून त्यांचा पराभव झाला. एक लाख 27 हजार 566 मतांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर विजयी झाले. मोदी लाटेतही मागील निवडणुकीत शिवसेनेला मिळालेली एक लाख सात हजार 759 मतांची लीड कमी करण्यात राणाजगजितसिंह यशस्वी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2009 च्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वाघाने राष्ट्रवादीच्या सिंहाचा पराभव केला होता. 2014 साली मागील निवडणुकीचे उट्टे काढत सिंहाने वाघावर कुरघोडी केली. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विधानसभा निवडणुकीप्रमाणेच शिवसेनेच्या वाघाने पहिला डाव जिंकला. आता दुसर्‍या डावाची आखणी सुरु झाली आहे. राणाजगजितसिंह (Ranajagjit Sinha Patil) आता भाजपाचे आमदार आहेत.

मोदींच्या नावाचा करिष्मा अजूनही कायम आहे. ठाकरेंची शिवसेना चिन्हासह एकनाथ शिंदेंनी काबीज केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाघाला मशाल घेवून महायुतीशी सामना करावा लागणार आहे. महायुतीकडून भाजप प्रबळ दावेदार असून प्रवीणसिंह परदेशी (PravinSinh Pardeshi) आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी सर्वाधिक चर्चा आहे. त्यामुळे कोणता सिंह ओमराजेंशी भिडणार? याची चर्चा झाली नाही तरच नवल!

(Edited By Deepak Kulkarni)

Dharashiv Lok Sabha Constituency
Lok Sabha Election 2024 : वाजवा रे वाजवा! घटकपक्ष बनले वाजंत्री, लोकसभेआधी महायुतीत वाढली खदखद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com