Eknath Shinde : नाशकात शिंदेंच्या शिवसेनेतच जुंपली; युवासेनेची शिंदेंना अहवाल सादर करण्याची तयारी

Nashik Shivsena : थेट एकनाथ शिंदेंना अहवाल देण्याच्या युवासेनेच्या इशाऱ्यानंतर दादा भुसे सक्रिय
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politcal News : शिंदेंच्या शिवसेनेत 'ऑल इज वेल' नसल्याचे चित्र सध्या नाशिकमध्ये आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अहवाल सादर करण्याची तयारी युवासेनेने सुरू केली आहे. याचाच अर्थ शिवसेना आणि युवासेनेत मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे.

शिवसेनेची वाढ जवळपास थांबली आहे. पक्षाचे काही पदाधिकारी टेंडरची कामे करण्यात मग्न आहेत. त्यामुळे शिवसेनेची कोठेही शाखा सुरू होत नाही. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा नाशिक (Nashik) दौरा चार वेळा रद्द झाला. तो का झाला, याचे उत्तर देण्यात येत नाही. त्यामुळे युवासेना संतप्त झाली आहे.

Eknath Shinde
Nashik Loksabha News : नाशिकमध्ये युती अन् आघाडीला मोठा धक्का ; 'या' महाराजांची अचानक राजकारणात एन्ट्री

शिवसेनेची (Shivsena) वाटचाल चिंताजनक असल्याचा आरोप करत या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच अहवाल सादर करण्याची तयारी युवासेनेने सुरू केली आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट होईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असा स्पष्ट इशारा युवासेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. शिंदे गटाने जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते यांची तर महानगरप्रमुखपदी प्रवीण तिदमे यांची निवड केली. सुरूवातीच्या टप्प्यात काही आजी माजी लोकप्रतिनिधींचा पक्ष प्रवेश झाला.

पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) नाशिकमध्ये एक दिवसाआड येतात. मात्र, तरीही पक्षाचा विस्तार होत नाही. पक्ष विस्तार करण्याचे काम पूर्णत: थंडावले आहे. दुसरीकडे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना टेंडर वाटप महत्त्वाचे वाटते. पालकमंत्री दादा भुसे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत. मात्र, या कामांचे नियोजन करण्यात ठाकरे गटाचा पदाधिकारी अग्रेसर कसा राहतो, असा प्रश्न युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार श्रीकांत शिंदे यांचा नाशिक दौरा चार वेळा रद्द झाला. गर्दी होईल की नाही, याची शाश्वती पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना नव्हती. त्याचमुळे असे झाले. याउलट युवा सेनेने मेळावा आयोजित केला. त्यात प्रचंड गर्दी झाली. युवासेनेकडून काम होते आहे. मात्र, त्याला पक्षाकडून कोणतीच साथ मिळत नसल्याची खंत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.

जिल्हा संपर्कप्रमुख जयंत साठे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांत हा सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल. दरम्यान, युवासेनेकडून याची जाहीर वाच्चता सुरू होताच या प्रकरणाची दखल पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतल्याची माहिती समोर येते आहे. याबाबत भुसे बैठक घेत असून, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा गैरसमज दूर होईल, असा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde
Sanjay Raut News : नगरमधील आमदारांच्या साडू - व्याह्यांच्या गुंडगिरी विरोधात राऊत आक्रमक ; काढणार महामोर्चा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com