Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Seat Allotment : महायुतीच्या तिकिटवाटपानंतर कुठलीही ब्रेकिंग मिळणार नाही; शिंदेंच्या मंत्र्याने केला दावा

Vijaykumar Dudhale

Nagpur, 14 September : पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना सूत्रांसारखी काही माहिती मिळाली असेल. तर त्याबद्दल मला माहिती नाही. पण, महायुतीच्या तीनही नेत्यांमध्ये बैठका झालेल्या आहेत. आमच्या तिकीट वाटपानंतर कुठली ब्रेकिंग मिळणार नाही, याची तजविज महायुतीने केली आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

अमरावतीमध्ये पीएम टेक्सटाईल पार्क घोषित करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, त्यासाठी मोदी हे 20 तारखेला वर्ध्यात येत आहेत. त्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी उदय सामंत (Uday Samant) आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे संभाव्य 25 उमेदवार जाहीर झाल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही शिवसेनेच्या 25 उमेदवारांची यादी तयार आहे, तीही येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, असे म्हटले होते. त्याबाबत विचारले असता सामंत यांनी गुलाबराव पाटील यांना जागा वाटपाबाबत सूत्रांसारखी माहिती मिळाली असेल, असे सांगितले.

उद्योग मंत्री म्हणाले, निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतील, याबद्दल मला माहिती नाही. महाविकास आघाडीच्या अगोदर चर्चेला सुरुवात झाली. महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच नाही. तीनही पक्षांमध्ये सन्मानजनक जागा वाटप होईल.

महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याबाबत उदय सामंत म्हणाले, स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. त्यांनी स्वप्न बघत राहावं. पूर्वी काँग्रेसची सत्ता का गेली, याच त्यांनी आत्मचिंतन करावं. राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात, त्यावरही खुलासा करावा. काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका महाराष्ट्र आणि देशासमोर आलेली आहे, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

पृथ्वीराज चव्हाण वेगळ्या ट्रॅकवर जनतेला नेण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत. फेक नरेटिव्ह सेट केला होता. त्याला उत्तर देण्याचे काम राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन केलं आहे. त्यावर मलमपट्टी लावण्याचे काम सध्या पृथ्वीराज चव्हाण करत आहेत, असा दावाही उदय सामंत यांनी केला.

ठाण्यातील टेंभी नाका येथील नोटा उधळण्याच्या व्हिडिओबाबत उदय सामंत म्हणाले, आनंद दिघे यांच्या आश्रमात अशा पद्धतीचे कृत्य जर कोणी करत असेल त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. त्याचा हेतू काय होता, हे देखील समोर आलं पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT