Solapur Politics : सांगलीनंतर सोलापुरातही शिवसेनेची आगळीक; अमर पाटलांच्या उमेदवारीचे संकेत, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

Sanjay Raut Solapur Tour : लोकसभा निवडणुकीच्या वेळीही खासदार संजय राऊत यांनीच जागा वाटप होण्याच्या अगोदरच सांगली मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती, त्यावेळी सांगलीतून काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती.
Amar Patil-Sanjay Raut
Amar Patil-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 September : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांचा मेळावा घेत खासदार संजय राऊत यांनी अमर पाटील यांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीच असाच प्रकार घडला होता. त्या वेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांत चांगलाच वाद रंगला होता. आता दक्षिण सोलापूरवर शिवसेनेने दावा केल्यानंतर काँग्रेसची भूमिका काय असणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील (South Solapur Constituency) शिवसैनिकांचा गुरुवारी रात्री खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा झाला. या मेळाव्यातून खासदार संजय राऊत यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अमर पाटील यांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली. आज सकाळी पत्रकार परिषदेत मात्र त्यावर स्पष्टीकरण देताना महाविकासा आघाडीच्या जागा वाटपावेळी आम्ही त्यावर बोलणी करू, असे सांगितले.

वास्तविक महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) जागा वाटपाची बोलणी पूर्ण होण्याअगोदरच शिवसेनेने (Shivsena) ही आगळीक सांगलीनंतर सोलापुरात पुन्हा एकदा केली आहे. त्यामुळे आता सोलापुरात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस पक्षात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

Amar Patil-Sanjay Raut
Vishal Patil : खासदार विशाल पाटलांनी पुन्हा मारली पलटी; आता म्हणतात, ‘रोहित पाटलांनाच आमदार करणार...’

लोकसभा निवडणुकीच्या वेळीही खासदार संजय राऊत यांनीच जागा वाटप होण्याच्या अगोदरच सांगली मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती, त्यावेळी सांगली मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी करत लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात ते जिंकून आले होते. मात्र, उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले होते.

आताही खासदार संजय राऊत यांनी सोलापुरात येऊन दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अमर पाटील यांच्या उमेदवारीची एक प्रकारे घोषणा केली आहे. वास्तविक या मतदारसंघातून मागच्या वेळी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली होती, त्यामुळे या मतदारसंघावरील दावा काँग्रेसने अद्याप सोडलेला नाही.

Amar Patil-Sanjay Raut
Dhangar Reservation : मी काय आमदार नाही; प्रत्येकानं मर्यादा ओळखून वागलं पाहिजे; प्रशांत परिचारक असं का म्हणाले?

महाविकास आघाडीतील जागा वाटपाची अद्याप चर्चाही झालेली नाही, त्यातच खासदार संजय राऊत यांनी दक्षिण सोलापूरमधून अमर पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत देत काँग्रेसला इशारा दिल्याचे मानले जात आहे. आता काँग्रेस पक्षाकडून कोणते पाऊल उचलले जाणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com