Congress leader Vijay Wadettiwar  Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्यानंतर केलेली 'ती' चूक 'ऑपरेशन सिंदूर'नंतर लगेचच सुधारली

Vijay Wadettiwar News : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन गंभीर आरोप केले होते. यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो, धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असं विधान केल्यामुळे नवा वाद पेटला होता.

Rajesh Charpe

Nagpur News : पहलगाम इथे भारतीय पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांना भारत केव्हा धडा शिकवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आठवडाभरापासून चर्चा आणि रणनीती आखली जात होती. यातच अनेक शहरांमध्ये मॉकड्रिल घोषित केल्याने केंद्र सरकारला नेमके काय करायचे आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. विरोधकांमार्फत पब्लिसिटी स्टंट केला जात असल्याचाही आरोप केला जात होता. मात्र, मॉक ड्रिलच्या आदल्याच दिवशी पाकिस्तानात घुसून दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले. पण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केलेली चूक काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर सुधारली आहे.

'ऑपरेशन सिंदूर'च्या (Operation Sindoor) माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेनं केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. निष्पाप भारतीयांना न्याय देण्यासाठी सैन्याने केलेल्या या कारवाईचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले. दहशतवादाविरोधात भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून भारतावर होणाऱ्या दहशतवादी कारवाया विरोधात भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. भारताविरुद्ध कोणताही दहशतवाद भारत सहन करणार नाही हाच संदेश आज या कारवाई मधून देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे, असं विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.

याआधी देखील देशावर जेव्हा संकट आले तेव्हा भारतीय सैन्याने कारवाई केली आहे. आणि आज देखील दहशतवाद्या विरोधात केलेल्या कारवाईने दाखवून दिले की भारत आपल्या नागरिकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि आज भारतीय सैन्याने एक मोठा धडा पाकिस्तानला शिकवला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन गंभीर आरोप केले होते. यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो, धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असं विधान केल्यामुळे नवा वाद पेटला होता.

चौफेर टीका झाल्यानंतर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्यावरुन खुलासाही केला होता. यात त्यांनी दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकारास इतर कोणताही रंग देण्यात येऊ नये,असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT