Operation Sindoor: भारतानं पाकिस्तानसह कुरापती चीनचाही टप्प्यात आणून केला 'करेक्ट कार्यक्रम'; जैश-ए-महंमदचं 'नेटवर्क'च उडवलं

India Attack On Pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शकरगड परिसरातील सरजालमधील हा दहशतवादी तळ त्याच्या दूरसंचार केंद्रामुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. येथे उच्च प्रतीची यंत्रणा बसविण्यात आली होती.
India operation sindoor Pakistan and china.jpg
India operation sindoor Pakistan and china.jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये बुधवारी (ता.7 मे) रात्री उशिरा हवाई हल्ले करत जैशे महंमदची दूरसंचार यंत्रणाच उध्वस्त केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. पंजाब प्रांतातील सरजालच्या तेहरा कलान गावातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावाखाली जैशेच्या संघटनेची दूरसंचार यंत्रणा कार्यरत होती. या यंत्रणेच्या मदतीने काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित केला जात असे. बुधवारी रात्री उशिरा भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत राबविलेल्या अचूकतेने केलेल्या हल्ल्यात हे केंद्र पूर्णपणे नष्ट झाले.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शकरगड परिसरातील सरजालमधील हा दहशतवादी तळ त्याच्या दूरसंचार केंद्रामुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. येथे उच्च प्रतीची यंत्रणा बसविण्यात आली होती. या यंत्रणेवर हल्ला केल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील त्यांच्या ‘म्होरक्यां’शी असलेला संपर्क तुटू शकतो.

पाकिस्तानी सैनिक आणि गुप्तचर संस्था आयएसआयने दहशतवाद्यांना सैनिकी दर्जाची दूरसंचार यंत्रणा पुरवली होती. यात लो-रा अल्ट्रा सेट्स आणि डिजिटल मोबाइल रेडिओचा समावेश आहे. या उपकरणाला पारंपरिक टेलिकॉम नेटवर्कची गरज भासत नाही आणि दहशतवाद्यांशी सहजपणे संवाद साधता येतो.

India operation sindoor Pakistan and china.jpg
Operation Sindoor And Pakistan : 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानला 24 तासांच्या आतच दुसरा मोठा झटका; शेअर बाजार कोसळला; सोन्याचा भाव तर...

तसेच, पाकिस्तानच्या सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेजवळ त्यांच्या दूरसंचार कंपन्यांचे सिग्नल सक्षम केले आहेत. यामुळे दहशतवादी पाकिस्तानी नेटवर्कचा वापर करत संवाद साधू शकतात आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांपासून बचाव करू शकतात. ही अल्ट्रा सेट्स चीनने(China) खास पाकिस्तानच्या सैनिकांसाठी तयार केलेली असून हे सामान्यतः संवाद साधण्यासाठी वापरण्यात येणाऱत्या मोबाईल (जीएसएम) आणि सांकेतिक (सीडीएमए) सारख्या तरंगलांबीशिवाय कार्य करतात.

प्रत्येक उपकरण रेडिओ लहरींवरून पाकिस्तानमधील नियंत्रण केंद्राशी संपर्क साधते आणि यासाठी चिनी उपग्रहांचा वापर केला जातो. लो-रा मॉड्यूल्स कमी फ्रिक्वेन्सीचा वापर करत लांबच्या वायरलेस संवादासाठी वापरली जातात, तर डीएमआर प्रणाली सार्वजनिक नसलेल्या रेडिओ नेटवर्कवर दोन-मार्गी संवाद साधण्याची सुविधा देतात. डीएमआर प्रणालीतील रचनेनुसार हे उपकरण वॉकी-टॉकीसारखे दिसते आणि १०० मीटरपासून १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत संवाद साधू शकतात. मात्र, डोंगराळ भागात संवाद साधताना अडथळा येऊ शकतो.

India operation sindoor Pakistan and china.jpg
Sharad Pawar News : संरक्षणमंत्री असताना पवार साहेबांनी एक निर्णय घेतला, जो आज इतिहास घडवतोय!

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सैन्यदलांनी मध्यरात्री 1 वाजून 05 मिनिटे ते 1 वाजून 30 मिनिटे या अवघ्या 25 मिनिटांत कारवाई करताना पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांची 9 दहशतवादी केंद्रे उध्वस्त केली. त्यातील 4 पाकिस्तान पंजाबमधील बहावलपूर आणि मुरीदके आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद व कोटली येथील आहेत.

यापूर्वी २०१६ मध्ये उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर झालेले सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ मध्ये बालाकोटमधील हवाई हल्ले त्यानंतर अलिकडच्या काळात भारताची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. दहशतवाद्यांच्या छावण्यांवर अचूक क्षमतेने हल्ला करण्यात आला. तसेच व्यापक परिसराचे नुकसान न होता योग्य लक्ष्य साधण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाच्या शस्त्रांची काळजीपूर्वक निवड करण्यात आली. प्रत्येक हल्ल्याचे केंद्र विशिष्ट इमारत किंवा इमारतींचा समूह होता. यात कोणत्याही लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले नाही, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com