vijay Wadettivar 
विदर्भ

Vijay Wadettivar: दम असेल तर फडणवीस शिंदे, पवारांनी...! वडेट्टीवारांचं थेट आव्हान; म्हणाले, तर ओबीसी समाज पाठीशी असेल

Vijay Wadettivar: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य शासनानं हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी ग्राह्य धरण्यात येतील असा शासन निर्णय जाहीर केला आहे. पण आता याच शासन निर्णयामुळं ओबीसी समाजामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Amit Ujagare

Vijay Wadettivar: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य शासनानं हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी ग्राह्य धरण्यात येतील असा शासन निर्णय जाहीर केला आहे. पण आता याच शासन निर्णयामुळं ओबीसी समाजामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण या जीआरद्वारे ओबीसींमध्ये मराठा समाजाची घुसखोरी होत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. त्यामुळं ओबीसी समाजाच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होणार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याचसाठी ओबीसी समाजाच्यावतीनं नागपूरमध्ये आज मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी संबोधित केलं. यावेळी वडेट्टीवारांनी मुखमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट आव्हान दिलं आहे. तसंच त्यांनी हे काम केलं तर ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही देखील दिली.

वडेट्टीवार म्हणाले, "एकदा जरांगेंनी जाऊन पाहावं, आमच्या गरिबाच्या मुलीला पाणी मिळत नाही, इतकी वाईट अवस्था आहे. मराठा समाजाला शासनानं 13,500 कोटी दिले, ओबीसी हा DNA असणाऱ्यांना भाजप सरकारनं काय दिलं तर 500 कोटी दिले. अजित पवारांनी सारथीची काचेची इमारत बांधली, आम्हाला भाड्याचा घरात इमारत दिली. आपण आपल्या हक्कासाठी 2 सप्टेंबरचा जीआर रद्द व्हावा यावर ठाम राहणार आहोत. हा मोर्चा तर झाँकी आहे अजून पिक्चर बाकी आहे"

ओबीसीत घुसखोरी होण्यापासून थांबवू, सरकार थांबवत नसेल तर सरकारला थांबवण्याची ताकद आमच्यात आहे. सरकारच्या नीतीमुळं दोन समाजात तेढ निर्माण झालं, धनगराला आदिवासी विरुद्ध उभं केलं. बंजारा समाज, ओबीसी, धनगरांमध्ये फूट पडण्याचं कामही सरकारकडून सध्या सुरू आहे. सरकारकडून समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत हैदराबाद गॅझेटियरसंदर्भातील हा आरक्षणाचा जीआर रद्द झाला पाहिजे, अशी मागणीही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, "दम असेल तर फडणवीस, शिंदे, पवार यांनी तेलगणांप्रमाणं 43 टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवावी, ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी राहिल" असं थेट आव्हानी यावेळी वडेट्टीवार यांनी दिलं. ते पुढे म्हणाले, आम्ही कोणाचा विरोधात नाही, आपल्याला लढावं लागणार आहे. जरांगेच्या दबावात सरकार झुकलं आहे, बेअक्कल, अनपढ लोकांनी ओबीसी समाजाचं नुकसान केलं, ओबीसीचं नुकसान सरकारनं केलं आहे. ओबीसींना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहा महिने लागतात. पण यांना हेच प्रमाणपत्र 1 तासांत मिळत आहे. ओबीसी बांधवानो सिद्ध व्हा, आघात करण्याची तयारी ठेवा, हातात पाणी ठेवत, ओठांवर चिंगरी ठेवत लढण्याची तयारी ठेवा अन्यथा तुम्ही बकऱ्यासारखे कापले जाल, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या मोर्चामध्य आपली भूमिका स्पष्ट केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT