Murlidhar Mohol: कोथरुडची गुन्हेगारी अन् चंद्रकांत पाटलांबाबत प्रश्न! पुण्याच्या खासदारांनी गुंडाळली पत्रकार परिषद

Murlidhar Mohol: गेल्या काही महिन्यांत पुण्यात कोथरुड भागात गुंडगिरीनं डोकं वर काढलं असून अनेक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत.
Morlidhar Mohol
Morlidhar Mohol
Published on
Updated on

Murlidhar Mohol: पुण्यातील कोथरुड भागात गेल्या काही महिन्यांत गुंडगिरीनं डोक वर काढलं असून संपूर्ण शहरातही अनेक गुन्हेगारी घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. या गुन्ह्यांच्या घटनांबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर गुरुवारी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढता पाय घेतला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भातही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही त्यांनी उत्तरं देणं टाळलं. त्यामुळं उत्तरं न देता निघून जाणाऱ्या खासदाराबद्दल पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Morlidhar Mohol
Nagpur Congress: नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष! वडेट्टीवारांच्या पुढाकारात निघणाऱ्या ओबीसी मोर्चात नेते सहभाही होणार का?

नेमकं काय घडलं?

भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २ नोव्हेंबरला संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीनं 'पुणे रन फॉर युनिटी' या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. याची घोषणा करण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी खासदारांना त्यांच्याच रहिवासी भागातील अर्थात कोथरुडमधील आणि आमदार चंद्रकात पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात वारंवार होत असलेल्या गुन्हेगारी घटनांबाबत प्रश्न विचारला. पण याबाबत प्रश्न विचारताच मोहोळ यांनी थेट आपल्या हातातला माईक बंद केला, लेपल माईक काढला आणि ताडकन उठून जाण्यासाठी निघाले.

Morlidhar Mohol
Bihar Election 2025 : 'मराठी सिंघम'ची बिहारमध्ये डरकाळी! IPS शिवदीप लांडे उतरणार विधानसभेच्या रिंगणात; कुठल्या पक्षानं दिलं तिकीट? जाणून घ्या

दरम्यान, आपल्या पुण्याचे प्रश्न आम्ही विचारत आहोत तुम्ही उत्तर द्यायला हवं असं काही पत्रकार त्यांना सांगत होते. पण त्यांची मागणी धुडकावत केवळ आपल्याला हवी असलेली माहिती सांगून भर पत्रकार परिषदेतून उठून निघून गेले. त्यांनी काढता पाय काढल्यानंतर पत्रकारांमध्येच खासदारांनी महत्वाच्या प्रश्नांना बगल दिल्याची चर्चा रंगली होती.

Morlidhar Mohol
अजित पवारांनी लॉन्च केला चॅटबॉट! सरकारी समस्यांवर थेट उपायांचा दावा

मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच पुण्याचे खासदार बनले आहेत. यापूर्वी त्यांनी पुण्याचे महापौर म्हणून यशस्वीरित्या आपली जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळं पुणेकर जनतेनं त्यांच्यावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या विश्वासानं जबाबदारी सोपवली. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना मोदींनी मंत्रीपदाची संधी दिली आणि ते केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री बनले. पण शहरातील वाढत्या गुंडगिरीवर वचक ठेऊ शकलेले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com