Yadvalkya Jichkar Vs Anil Deshmukh  Sarkarnama
विदर्भ

Congress Vs NCP : याज्ञवल्क्य जिचकरांच्या 'घरवापसी'मुळे काँग्रेस अन् राष्ट्रवादीत पुन्हा वादाची ठिणगी?

Vidarbha Congress News : अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर नाराजीसुद्धा वर्तविली होती. त्यामुळे जिचकारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News: विधानसभेच्या निवडणुकीत काटोल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणारे युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सचिव याज्ञवल्क्य जिचकार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना आव्हान दिले होते. या निवडणुकीत भाजपचे चरणसिंग ठाकूर विजयी झाले. बंडखोरीमुळे त्यांना काँग्रेसने (Congress) जिचकारांना निलंबित केले होते. आता त्यांच्या घरवापसीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा मतभेद उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे ते चिरंजीव आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाचवेळा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी निवडणूक लढवली होती. यापैकी चारवेळा ते निवडून आले होते. महाविकास आघाडीमुळे काटोल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला संधीच मिळत नव्हती. याज्ञवल्क्य जिचकार यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती.

काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्याची मागणी त्यांनी केली. मात्र अनिल देशमुख सातत्याने विजयी होत असल्याने शरद पवार यांनी या मतदारसंघावर दावा सोडण्यास नकार दिला होता. निवडणुकीचा अर्ज भरेपर्यंत काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्यात येणार असल्याचे ते दावा करीत होते. ती नाकारल्यानंतरही जिचकारांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला होता.

अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर नाराजीसुद्धा वर्तविली होती. त्यामुळे जिचकारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत. यात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचाही समावेश आहे.

जिचकारांचे निलंबन रद्द करण्यात आल्याने मुळक यांच्याही घरवापसीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी(ता.17) प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे एका कार्यक्रमात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिचकारांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT