Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Video Vijay Wadettivar News : चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; महायुतीचे सरकार विश्वासघातकी, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Political News : शेतकऱ्याच्या विरोधातील निर्णय घेत या सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभेच्या निवडणुकीत हुकूमशाही प्रवृतीच्या नेत्याला मतदारांनी जागा दाखवली आहे. राज्यातील महायुतीचे हे सरकार विश्वासघातकी आहे. महायुती सरकारने राज्याला खड्ड्यात घालण्याचे पाप केले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधातील निर्णय घेत या सरकारने शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनापूर्वी बुधवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. (Vijay Wadettivar News)

गुरुवारपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता उद्यापासून सुरु होणारे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभाराची वाभाडे काढताना चोफेर टीका केली. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. या नाराजीचा फटका महायुतीला (Mahayuti) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसला आहे. त्यानंतरही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसल्याचे दिसत आहे.

यावेळी पत्रकार परिषदेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी सरकारच्या कारभारावर विरोधकांनी गंभीर आरोप केले.

'त्रिकुटाचे सरकार लुटारू सरकार'

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील हे त्रिकुटाचे सरकार आहे. हे सरकार सध्या राज्यातील सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. त्यामुळे या त्रिकुटाचे सरकार म्हणजे लुटारू सरकार आहे, असा आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT