Aditya Thackeray : विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच आदित्य ठाकरेंकडून राहुल गांधींचं अभिनंदन; म्हणाले, आम्ही लवकरच...

Aditya Thackeray On Rahul Gandhis Leader of Opposition post : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
Rahul Gandhi, Aditya Thackeray
Rahul Gandhi, Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray On Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पाठविण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब झालं.

राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्विकारल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य (Aditya Thackeray) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, "विरोधी पक्षनेतेपद स्विकारल्याबद्दल राहुल गांधीजी यांना शुभेच्छा. या देशातील जनतेने हुकूमशाहीच्या विरोधात आणि द्वेषाच्या फुटीर राजकारणाच्या विरोधात मतदान केले आहे. राहुल गांधीजी ज्यांचा आवाज ऐकला जात नाही, त्यांचा आवाज बनतील.

Rahul Gandhi, Aditya Thackeray
Rahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपद मिळताच अंदाजही बदलला; 'टी-शर्ट'मधील राहुल गांधी संसदेत...

विरोधी पक्ष म्हणून, आम्ही आमच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचे, संविधानाचे समर्थन करण्याचे आणि महत्त्वाचे म्हणजे संसदेतील प्रत्येक शेवटच्या व्यक्तीला आवाज देण्याचे आमचे कर्तव्य पूर्ण करण्याचे वचन देतो. हे कर्तव्य, आम्ही सरकार म्हणून लवकरच इंडिया आघाडी पूर्ण करू." अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) शुभेच्छा दिल्या.

Rahul Gandhi, Aditya Thackeray
Lok Sabha Speaker Om Birla: सहा वर्षांपूर्वी राहुल गांधींची मोदींसोबत गळाभेट, आता 'शेक हँड'; सभागृहात टाळ्यांचा कडकडाट..

या शुभेच्छा देताना त्यांनी आम्ही लवकरच सरकार म्हणून आमची कर्तव्य पार पाडू असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे एनडीए सरकारला इंडिया आघाडी पर्याय देऊ शकते. हा दावा पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून केल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

दरम्यान, आज बुधवारी (ता. 26 जून) रोजी लोकसभा अध्यक्षपदी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी बिर्ला यांची निवड झाल्याचे घोषित केले.18 व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com