Kolhapur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले तर महाविकास आघाडीचा सुफडसाफ झाला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी मतदानाची आकडेवारी सादर करून महायुतीवर हल्लाबोल केला. त्यासोबतच त्यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबाबत मोठे विधान केले आहे. (Sharad Pawar News)
कोल्हापूरमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. राज्यातील अथवा देशातील विरोधी पक्ष प्रभावी बनू नये याची खबरदारी घेतली जात आहे. पण नागरिकामध्ये असे चित्र नाही. लोकांमध्ये उत्साह नाही. लोकांना ते अभिप्रेत नाही. कोणताही उत्साह नाही. आमच्याकडे सत्ता असो वा नसो. संसदीय अधिकार असो वा नसो. आम्ही जागरूक राहणार. लोकांमध्ये राहणार, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
त्यातच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबाबत (Mamta Banrajee) मोठे विधान केले आहे. ममता बॅनर्जी या प्रभावी नेत्या आहेत. त्यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी संसदेत पाठवलेले नेते जागरूक आणि मेहनती आहेत. कष्टाळू आहेत, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी शरद पवार यांनी मतांची आकडेवारी सांगितली. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत राज्यात 80 लाख मते पडली, तरीही काँग्रेसचे फक्त 15 उमेदवार निवडून आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात 79 लाख मते पडली म्हणजे काँग्रेसपेक्षा एक लाख कमी तरी देखील त्यांचे 57 उमेदवार निवडून आले, अजित पवार यांच्या गटाला 58 लाख मते पडली त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. आम्हाला 72 लाख मत पडले आणि आमचे फक्त दहाच निवडून आले. हे काही तरी आहे, असा सवाल शरद पवार यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.