Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आता भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. यासाठी शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे खासदार आणि सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट झाल्याची चर्चा होती. त्यानंतरच या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरु झाली. याप्रकरणी आता दिल्लीतील बैठकीला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, विनोद तावडे आणि मी अनेकवेळा भेटलो आहोत आम्ही दोघेही एकाच जेपीसीमध्ये आहोत. या कमिटीमध्ये मी आणि विनोदजी गेल्या महिन्याभरात २१ वेळा भेटलो आहोत. गेल्या बारा वर्षांपासून हे सातत्यानं बोललं जात आहे. आता पुढची २०२९ लाही हाच कारभार झाला तर मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना लढावंच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल.
शरद पवारांची एनडीएसोबत जाण्याची चर्चा सुरु आहे हे मात्र नक्की आहे. पण आता त्यांना कोणता रस्ता सोयिस्कर असतो वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून सत्ता, संपत्ती आणि मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं याचा त्या लोकांचा संबंध आहे. पण जी पुरोगामी विचारांची मंडळी आहे ती नक्कीच काँग्रेससोबत राहील असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील बैठकीनंतर बोलताना सांगितलं की, "महाराष्ट्रातून एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आत्ता एनडीएमध्ये येण्याची आमची चर्चा नाही. आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. शरद पवारांच्या पक्षात जे कोणी आमदार आणि खासदार आहेत त्यांना कोणालाहा फोडण्याचा आमचा प्रयत्न नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.