Government Schemes: भारतातील सरकारी योजनांची 'या' देशामध्ये होतेय कॉपी! खुद्द राष्ट्रपतींनी दिली कबुली

Government Schemes: भारतात राबवल्या जाणाऱ्या सरकारी योजनांची कॉपी काही देशांमध्ये त्यांच्या सरकारांकडून केल्या जात असल्याचं समोर आलं आहे. याची कबुली खुद्द एका देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच दिली आहे.
PM Modi_Prabovo Subiyanto
PM Modi_Prabovo Subiyanto
Published on
Updated on

Government Schemes: भारतात राबवल्या जाणाऱ्या सरकारी योजनांची कॉपी काही देशांमध्ये त्यांच्या सरकारांकडून केल्या जात असल्याचं समोर आलं आहे. याची कबुली खुद्द एका देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच दिली आहे. म्हणजेच भारतातील योजनांचा प्रभाव इतर देशांवरही पडल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.

PM Modi_Prabovo Subiyanto
E20 Petrol Row : E20 पेट्रोल वाहनांसाठी घातकच! इंजिन फेल होण्यासही ठरतंय कारणीभूत; संशोधनातून धक्कादायक वास्तव उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसीय इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवाणीत त्यांनी भारताचा विकास आणि धोरणांचं कौतुक केलं. यावेळी प्रबोवो म्हणाले, मी आपल्या राजकीय प्रवासाचं अनुकरण केलं आहे. तसंच आपल्या बऱ्याच योजनांची नक्कल देखील करतो. जर ती योजना करोडो लोकांसाठी यशस्वी झाली आहे. ज्यांच्या अडचणी आमच्यासारख्याच आहेत. त्यामुळं त्या कॉपी करायला कसलीही लाज वाटता कामा नये.

प्रबोवो म्हणाले की, भारत आणि इंडोनेशिया दोन्हीही मोठी लोकसंख्या असलेले देश आहेत. तसंच कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या समान आव्हानांचा सामना करतात. पण याव्यतिरिक्त भारतानं उल्लेखनीय प्रगती केली आहे.

PM Modi_Prabovo Subiyanto
Ameet Satam: सोशल मीडियात प्रचंड ट्रोल झाल्यानंतर अमित साटमांचं स्पष्टीकरण; म्हणाले, मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीबाबत बोलताना जयंत पाटलांनी...

भारतीय योजनांवर काय म्हणाले?

प्रबोवो भारतीय योजनांबाबत बोलताना म्हणाले, मला याचा आनंद आहे की, तुमच्या योजनांवर कोणतंही कॉपीराईट नाहीत. त्यामुळं मी तुमच्या अनेक योजना कॉपी करतो. जे चांगलं आहे ते स्विकारायला आम्ही बिल्कुल संकोच करत नाही. यावर पंतप्रधान मोदी यांच्यासह तिथं उपस्थित असलेले इतर लोकही हास्यकल्लोळात बुडाले.

PM Modi_Prabovo Subiyanto
NCP with NDA: शरद पवारांचा पक्षही भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा! अधिवेशन सुरु असतानाच मुख्यमंत्री अचानक दिल्लीला होणार रवाना; नेमकं काय सुरुए?

प्रबोवो यांनी म्हटलं की, नुकतेच इंडोनेशियाचं एक शिष्यमंडळ भारतात दोन-तीन आठवड्यांच्या अभ्यास दौर्यावर आलं होतं. या दरम्यान त्यांनी नापीक जमिनीतही पीकं घेण्याच्या भारतीय तंत्रज्ञान आणि विशेषत्वानं परमाकल्चर मॉडेलचा अभ्यास केला. या सर्व गोष्टींचा आम्ही गांभीर्यानं अभ्यास करत आहोत. आम्हाला भारताकडून बरंच काही शिकायचं आहे आणि शिकण्यासाठी आम्हाला काहीही संकोचही वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com