

Ameet Satam: मुंबईत झाकण नसलेल्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीबाबत गांभीर्यानं चर्चा करण्याऐवजी भाजप आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांचा हसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्यांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. पण नेमकं यावेळी काय घडलं होतं? याचं स्पष्टीकरण त्यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान दिलं आहे. यावेळी जयंत पाटील यांचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
अमीत साटम म्हणाले, गेल्या आठवड्यात मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी मीडियाशी बोलत असताना त्या ठिकाणी जयंत पाटील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मिश्किलपणे कुठल्यातरी वेगळ्या विषयावर माझ्याशी चर्चा केली. ती चर्चा करत असताना मी त्यांच्याशी काही बोललो आणि त्याच मिश्लिपणे मी त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर ते तिथून निघून गेले, पण त्यानंतर संदर्भ बदलून ती तेवढीच क्लिप काढण्यात आली आणि एका वृत्तवाहिनीनं ती टीव्हीवर चालवली आणि त्यात असं म्हटलं की मी त्या मृत्यूंवर हसत होतो. पण मी त्या मृत्यूंवर हसत नव्हतो असं कोणी हसू शकत नाही.
मी सोडा कोणीही मृत्यूंवर हसू शकत नाही. विधानभवनाचे आपण पालक आहात विधानभवनाच्या परिसरात अशा प्रकारची घटना घडली आहे. ही घटना माझ्यासोबत घडली ती तुमच्या कोणासोबतही घडू शकते, हे या २८८ सदस्यांसोबतही घडू शकते तसंच वरच्या सभागृहातील सदस्यांबाबतही हे घडू शकतं. त्यामुळं या प्रकाराची आपण गंभीर नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करणं अपेक्षित आहे, अशी विनंती यावेळी अमीत साटम यांनी विधानसभा अध्यक्षांकडं केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.