ZP Election Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

ZP, पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट; तिढा सुटताच मतदान, निकालाचा दिवस ठरला...

State Election Commission Maharashtra : निवडणूक आयोगाने 29 महापालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Rajanand More

Local body election schedule : मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा तिढा अखेर सुटला आहे. सुप्रीम कोर्टाने ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासाठी कालच मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानेही युध्दपातळीवर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. पूर्वी ही मुदत ३१ जानेवारीपर्यंतच होती. पण महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आयोगाला पूर्वीच्या मुदतीत निवडणूक घेणे शक्य झाले नाही. आता कोर्टानेच मोकळीक दिल्याने आयोगानेही वेगाने हालचाली करत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित केले असून त्याची घोषणाही आजच केली जाणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात १२ झेडपी आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. आज दुपारी ४ वाजता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान असू शकते.

उर्वरित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा फैसला आता २१ जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीवर अवलंबून असणार आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने उरलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर बंधने आली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानुसार पहिल्या टप्प्यात 288 नगरपालिका आणि नगरपंचायती पार निवडणुक पार पडल्यानंतर आयोगाने 29 महापालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT