Trans Harbour Link  sarkarnama
मुंबई

Trans Harbour Link Toll : अखेर ठरलं! शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 नव्हे इतका टोल....

Mumbai News : 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव

Mumbai : मुंबईतून नवी मुंबईतून येण्यासाठी अवघे 20 मिनिटे लागणार आहेत. त्यासाठी शिवडी-न्हावाशेवा सागर सेतू महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, या सागरी सेतूवर टोल किती असणार यावरून एकमत होत नव्हते. या मार्गावर 500 रुपये टोल प्रस्तावित असल्याचे चर्चा होत्या. त्यामुळे वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. मात्र, सरकारच्या घोषणेनंतर वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शिवडी-न्हावाशेवा या मार्गवर 250 रुपये इतका टोल निश्चित करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवडी-न्हावाशेवा या मार्गाच उद्घाटन येत्या 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

शिवडी-न्हावाशेवा हा बहूचर्चित प्रकल्प आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावाशेवा पुलाचे उद्घाटन होण्याची घोषणा केली. शिवडी-न्हावाशेवा उड्डाणपुलाच्या उद्घाटनाबरोबरच ऑरेंज गेट रस्त्याचे व ठाणे-बोरीवली बोगद्यांचे भूमिपूजन होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह हा भुयारी मार्ग असणार आहे. त्यामुळे ईस्टर्न फ्री-वे ते मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहतुकीचा वेळ वाचणार आहे. हा भुयारी मार्ग 40 मीटर खोल असणार आहे. कोस्टल रोड ते ईस्टर्न फ्री-वे अंतर 10 मिनिटांत कापले जाणार आहे. देशातील सर्वात मोठा सागरी पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक असेही म्हणतात.

हा सागरी पूल मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. या पुलाची लांबी 21.8 किलोमीटर आहे. त्याचे अधिकृत नाव श्री अटलबिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक, असे ठेवण्यात आले आहे. सेंट्रल मुंबईतील शिवरीहून नवी मुंबईतील शिवाजीनगरला या पुलावरून अवघ्या 20 मिनिटांत पोहोचता येणार आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT