PM Narendra Modi : अभिनेत्री कंगना रनौतनंतर आणखी एका अभिनेत्रीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यासाठी स्टार आहेत. मी त्यांची भक्त आहे. त्यांनी आपला देश एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. मला गर्व आहे, की मी मोदींच्या देशात राहते.
व्होकल फॉर लोकल या मोहिमेचा भाग मी झाले तेव्हा मला अभिमान वाटला असल्याचे तिने म्हटले आहे. पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव करणारी अभिनेत्री म्हणजे ‘अनुपमा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली रुपाली गांगुली होय. सर्वांनाच ज्ञात असलेली रुपाली हिची अनुपमा ही मालिका 2020 मध्ये कोरोनाची लाट असताना सुरू झालेली मालिका होती.
मात्र ही त्या काळातली सर्वाधिक जास्त वेळ पाहिली गेलेली मालिका ठरली होती. या मालिकेचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही केलं. व्होकल फॉर लोकलच्या कँपेनमध्ये रुपाली गांगुलीच्या अनुपमाचा व्हिडीओ दाखवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना रुपाली म्हणाली, मोदी हे माझ्यासाठी स्टार आहेत. मी त्यांची भक्त आहे.
त्यांनी आपला देश एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. मला गर्व आहे, की मी मोदींच्या देशात राहते. व्होकल फॉर लोकल या मोहिमेचा भाग मी झाले तेव्हा मला अभिमान वाटला. रुपाली गांगुलीने अनुपमा मालिकेबरोबरच साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतही काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी मालिका अनुपमाचा व्हिडीओ शेअर केला तो क्षण माझ्यासाठी अद्भुत होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मला अनुपमा मालिकेचेही आभार मानायचे आहेत. कारण या मालिकेमुळेच मी इतक्या उंचीवर पोहोचू शकले. मी त्या मोहिमेचा भाग झाले होते, यावर मला आजही विश्वास बसत नाही, असेही रुपाली गांगुलीने म्हटले आहे. ही मालिका गुजरात (Gujrat) बेस्ड आहे. अहमदाबादमध्ये ही मालिका लोकप्रिय ठरली. भारतीय ब्रँडसाठी मी लोकल फॉर व्होकलचा भाग झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं महत्त्व सांगितलं ते माझ्यासाठी हिरोप्रमाणेच आहेत, असंही रुपाली गांगुलीने म्हटलं आहे. आशा आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही मालिका पाहिली असावी, असे रुपाली गांगुली हिने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.