Mahayuti Government Sarkarnama
मुंबई

Cabinet Expansion : महायुतीचे 35 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ; तीनही पक्षांची संभाव्य यादी पाहा

Mahayuti State Government: भाजप आपल्या कोट्यातील मंत्रिपदाच्या काही जागा रिक्त ठेवणार असल्याची माहिती आहे. त्याद्वारे इच्छुकांना झुलवत ठेवण्याचे भाजपचे धोरण दिसून येत आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 14 December : महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रविवारी (ता. १५ डिसेंबर) नागपुरात होणार आहे. पहिल्या विस्तारात महायुतीचे तब्बल ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये साहजिकच भाजपचे सर्वाधिक आमदार असणार आहेत. भाजप आपल्या कोट्यातील काही मंत्रिपदाच्या जागा रिक्त ठेवणार असून शिवसेना मात्र सर्व जागा भरणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या कोट्यातील सर्व मंत्रिपदे भरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपच्या वाट्याला २१ मंत्रिपदे येणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसला आठ ते नऊ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजप आपल्या कोट्यातील मंत्रिपदाच्या काही जागा रिक्त ठेवणार असल्याची माहिती आहे. त्याद्वारे इच्छुकांना झुलवत ठेवण्याचे भाजपचे धोरण दिसून येत आहे.

दरम्यान, भाजपकडून महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीत वरिष्ठ हायकमांडकडे पाठविण्यात आली आहे. ते यादीवर शिक्कामोर्तब करतील, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांना दुपारनंतर मंत्रिपदाबाबत कळविणार आहेत.

शिवसेनेच्या वाट्याला मंत्रिपदाच्या जागा कमी आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्याने एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांचा फार्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे, त्यामुळे पहिल्याच टप्प्यात सर्वच जागा भरण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असणार आहे. पुढच्या टप्प्यात उर्वरीत इच्छुकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पहिल्याच टप्यात सर्वच जागा भरणार का, याची उत्सुकता आहे.

दरम्यान, पहिल्या टप्पात महायुतीचे सुमारे ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नव्या रचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला आठ किंवा नऊ मंत्रिपदे मिळू शकतात. महायुतीच्या फार्म्युल्यानुसार पाच आमदारांमागे एक याप्रमाणे मंत्रिपदाचे सूत्र ठरल्याची माहिती आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आठच मंत्रिपदे मिळू शकतात.

महायुतीचे संभाव्य मंत्री पुढील प्रमाणे

भाजप : चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, रणधीर सावरकर, संजय कुंटे, परिणय फुके, पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, विजयकुमार देशमुख, गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ, राहुल कुल, जयकुमार रावल, योगेश सागर, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नीतेश राणे ही नार्वे चर्चेत आहेत.

शिवसेना : उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर, विजय शिवतारे, राजेश क्षीरसागर, दीपक केसरकर, योगेश कदम, विजय शिवतारे.

राष्ट्रवादी काँग्रेस : छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, दत्तात्रेय भरणे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, सना मलिक यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT