Mahayuti Cabinet Expansion : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? शिंदेंपाठापोठ 'या' खात्यासाठी भाजपकडून अजितदादांचीही कोंडी?

Maharashtra government Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. मात्र, यावेळी केवळ 15 ते 20 मंत्र्यांचाच शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Dec : महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. मात्र, यावेळी केवळ 15 ते 20 मंत्र्यांचाच शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा असणार आहे.

पण भाजपने आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील हवं ते खाते देण्यास विरोध केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच अजित पवार हे दिल्लीत ठाण मांडून बसल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस झाले आहेत.

त्यामुळे संपूर्ण राज्यासह विजयी आमदारांचं लक्ष मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे लागलं आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी रात्री दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांविरोधात काँग्रेसची मोठी खेळी; 'हा' तगडा उमेदवार मैदानात उतरवला

त्या चर्चेत महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी उद्या शनिवारी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी भाजपचे 8 ते 10 तर शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे प्रत्येकी 4 ते 5 आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

मात्र, भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना गृहखातं आणि नगरविकास खातं देण्यास विरोध केला आहे. तसंच अजित पवारांना देखील अर्थखातं देण्यास विरोध केल्याची चर्चा सुरू आहे. तर आपणाला अर्थखातं मिळावं यासाठी अजितदादांनी दिल्लीत फिल्डिंग लावल्याचीही चर्चा आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
DCM Eknath Shinde : फडणवीस अन् अजितदादा दिल्लीत बिझी तर एकनाथ शिंदे पुढील 'मिशन'च्या तयारीलाही लागले!

शिवाय आधीच्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे 9 मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद होते. या सरकारमध्येही तेच सूत्र कायम रहावं असा आग्रह पवारा यांनी केला आहे. त्यामुळे भाजप अजितदादांची मागणी मान्य करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com