BJP-Congress Fraud : Sarkarnama
मुंबई

BJP-Congress News : भाजप पदाधिकाऱ्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यालाच घातला 2 लाखांचा गंडा ; मुरबाडमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Crime : भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्याची 2 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून भाजप पदाधिकाऱ्याने दोन लाखांची फसवणूक केल्याची माहिती मुरबाड तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी मधुकर देसले (वय 56) यांनी टोकावडे ग्रामीण पोलिस ठाण्यात संतोष पवार आणि जगदीश वाळिंब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

संतोष हा ठाणे जिल्हा भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी आहे. तर त्याचा साथीदार जगदीश हा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. मधुकर देसले मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथील रहिवासी आहेत. तर तेथली तहसील कार्यालयासमोर संतोष पवारचे झेरॉक्सचे दुकान आहे.या दुकानातच २०२१ मध्ये संतोष आणि मधुकर यांची ओळख झाली.

या दोघांच्याही भेटीगाठी वाढत गेल्या. संतोषने मधूकडे देसले यांच्याकडे पत्नीचे गहान ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी दोन लाखाची मागणी केली होती. तसेच पाच दिवसात आपण हे पैसे परत करुन असं आश्वासनही संतोषने दिले. (BJP)

25 ऑगस्टला पुन्हा दोघांची दुकानात भेट झाली. संतोष याने मधुकर यांच्याकडे पत्नीचे गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यासाठी पाच दिवसांसाठी दोन लाख रुपये देण्याची मागणी केली होती. मधूकर यांनी विश्वासाने संतोषला दोन लाख रुपये दिले. याच दरम्यान आरोग्य विभागात नोकरीसाठी जाहिरात निघाली आहे. आरोग्य विभागातला अधिकारी माझा नातेवाईक आहे, तुमच्या नातेवाईकांना नोकरी लावायची असेल तर सांगा, तो नोकरी लावून देण्याचं काम करेल असं संतोषने मधूकर यांना सांगितलं. (Maharashtra Politics)

या आमिषाला बळी पडत मधूकर देसले यानी आपला भाचा गणेश घोलप याला नोकरीला लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर संतोषनेही त्यांना काम होईल, असं आश्वासन दिलं. पण

26 ऑगस्टला मुंबईतील एका हॉटेलमध्ये संतोषने तोतया आयपीएस अधिकारी जगदीश याच्याशी मधुकर यांची भेट घडवून आणली. या हॉटेलच्या बैठकीतच गणेश घोलप याला नोकरी लावून देण्याचे मान्य केलं.पण यासाठी १० लाख रुपये भरावे लागतील, असंही सांगितलं. तसेच, तीन लाख रुपये आगाऊ रक्कम द्यावी लागेल, असंही जगदीशने सांगितले, या दोघांवर विश्वास ठेवत मधुकर देसले यांनी एक लाख रुपये संतोष व जगदीश यांना दिले. (BJP- Congress)

सप्टेंबर नंतर गणेशच्या नोकरीचे काय झाले, काम कधी होणार असं मधूकर यांनी संतोष यांना विचारले असते त्याने आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याचं सांगितलं. त्यानंतर मधूकर यांनी नोकरीसाठी दिलेली रक्कम परत करण्याचा तगादा लावला. संतोषने मधूकर देसले यांना दोनदा चेक दिले, पण दोन्ही वेळी ते बाऊन्स झाले.या प्रकाराला वर्ष उलटूनही संतोषने पैसे दिले नाहीत.

मधल्या काळात संतोषने 50 हजार दिले. पण उरलेली रक्कम देण्यासा संतोष टाळाटाळ करत होता. याच काळात त्याने मधूकर यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. अखेर ७ जुलैला मधूकर देसले यांनी संतोष पवार आणि त्याचा साथीदार जगदीश वाळिंब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. मुरबाड पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT