Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray Speech: आदित्य ठाकरेंनी सभागृहातलं भाषण गाजवलं; मुख्यमंत्र्यांंनाही सोडलं नाही; म्हणाले...

Maharashtra Assembly Session : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवतानाच चड्डी बनियन गँग म्हणून डिवचलं. त्यांच्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँन्टिनच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीची किनार होती.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आठवड्याचा पहिलाच दिवस सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी चांगलाच वादळी ठरला ठरल्याचं दिसून आलं. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला जोरदार शा‍ब्दिक टोले लगावले.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावेळी चिमटे काढले.

वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सोमवारी(ता.14) लक्षवेधी मांडतानाच महायुती सरकारला धारेवर धरले. त्यांनी यावेळी राज्यात चड्डी बनियन गँगचे काहीही सुरू असल्याची जोरदार टीका केली. तसेच त्यांनी यावेळी युतीधर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाईही करता येत नाही,असल्याचं आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवतानाच चड्डी बनियन गँग म्हणून डिवचलं. त्यांच्या टीकेला आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासातील कँन्टिनच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीची किनार होती.

आदित्य ठाकरे म्हणतात, मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळणं गरजेचं असल्यानं त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्या लोकांसोबत ते बसलेत ते चड्डा बनियन गँग ते कुणालाही मारतात, काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही.

आदित्य ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक यासाठी करतो की, त्यांनी मोठी सहनशीलता दाखवली. ते कुणावरही कारवाई करत नाहीत.मात्र,सध्या राज्यात जे सुरू आहे, मुंबईत जे सुरू आहे, त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. चड्डी बनियन गँगवर कडक कारवाई करावी आणि शासन काय असते ते दाखवून द्यावं, असं खुलं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिलं.

पीडीपी चाळीसारखी करा ना धारावीची डेव्हल्पमेंट, आमचा विरोध नाही. म्हाडाला,एसआरएला पैसे येतील, कॉन्ट्रॅक्टर निवडा आणि करा धारावीची डेव्हल्पमेंट. त्यांना प्रिमियम भरायला लावा,जी जागा देताहेत त्यासाठी पैसे भरायला लावा. पण आमची मुंबईत जी साडेसातशे स्केअरपर्यंतची घरं आहेत, त्यांना प्रॉपर्टी टॅक्स माफ झालाच पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं आदित्य ठाकरेंनी केली आहे.

याचदरम्यान,आदित्य ठाकरेंनी बेस्टच्या बससाठी जी दुप्पट भाडेवाढ केली आहे, ती रद्द झालीच पाहिजे, अशी दुसरी मागणीही केली. जो अदानी टॅक्स आमच्यावर लादत आहात, तोही रद्द केलाच पाहिजे. तो नुसता पुढं ढकलून चालणार नाही, तो रद्द केलाच पाहिजे, असंही सरकारला ठणकावलं.

तसेच आदित्य ठाकरेंनी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूरच्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची आठवणही करुन दिली. ते म्हणाले,मुख्यमंत्र्यांनी मला नागपूरच्या अधिवेशनात मुंबईमध्ये फ्री-व्होल्ड करण्यासाठी जो कन्वर्झनचा चार्ज लागतो,तो कमी करण्याचं आश्वासन अजून बाकी आहे, असंही ठाकरे म्हणाले.

तुम्हांला राजकीयदृष्टीनं हे निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल तर करा,माझी काहीही हरकत नाहीये. पण त्यावेळी सगळी यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागलेली असते,त्याचा लोकांसाठी काही उपयोग होत नाही. तुम्ही तुमचे शंभर होर्डिंग्ज लावा,आम्हीही लावू. पण तुम्ही जो फ्री होल्ड करण्यासाठीचा जो कन्वर्झना चार्ज लावला आहे, तो रद्द करा, अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी यावेळी सभागृहात बोलताना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT