Mumbai News: दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर आता मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आले असून 10 हजारांहून अधिक शस्त्र परवान्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. (Abhishek Ghosalkar Murder Update)
काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच दहिसरमधील अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. मॉरिसने त्याच्या बॉडिगार्डच्या बंदूकीतून गोळ्या झाडून अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबरोबरच मुंबई पोलिसांनी आता मोठा निर्णय घेत तब्बल 10 हजारांहून अधिक शस्त्र परवान्यांची मुंबई पोलिसांनी पडताळणी सुरू केली आहे. यामध्ये पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकीय व्यक्ती, सुरक्षा रक्षक, व्यावसायिकांसह ज्यांना शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
तसेच मुदत संपलेले परवाने, बोगस शस्त्र परवाने बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे, अशी माहिती सांगण्यात येत आहे. याबरोबरच शस्त्र परवानाधारक व्यक्ती कुठल्या अडचणीत आहेत का ? त्यांचा कुणाशी वाद आहे का ? याची माहिती देखील पोलिस गोळा करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे आता पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.