Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करणारा मॉरिस याच्या बॉडिगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आर्म अॅक्ट कायद्यांतर्गत मुंबई क्राइम ब्रँचने अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. मिश्राला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आता मुंबई पोलिस गतीने पावलं उचलत आहे. दरम्यान, मॉरिसने ज्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या त्या बंदुकीचे लायसन्स उत्तर प्रदेशातील फुलपूर जिल्हा पोलिसांनी जारी केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या संदर्भात आता अमरेंद्र मिश्राला अटक केली आहे.
मॉरिसने ही बंदूक आपला बॉडिगार्ड अमरेंद्र मिश्रा याच्याकडून घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही बंदूक मॉरिसने स्वतःकडे कधी घेतली? या पूर्व नियोजित कटामध्ये मॉरिसचे किती समर्थक यामध्ये सामील आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.