Pankaja & Pritam Munde Sarkarnama
मुंबई

Pankaja & Pritam Munde News : मुंडे भगिनींची भाजपच्या राज्यस्तरीय शिबिराला दांडी; राजकीय चर्चांना उधाण...

मुंडे भगिनींची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत आहे, त्यामुळे या दोघींच्या गैरहजेरीबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सरकारनामा ब्यूरो

BJP Bhiwandi Workshop : भारतीय जनता पक्षाचे भिवंडीत सध्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या असलेल्या शिबिराकडे माजी मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनी मात्र पाठ फिरवली आहे. त्यांच्या या अनुपस्थितीची चर्चा सध्या राज्यात सुरू झाली आहे. (Absence of Munde sisters from BJP's state level camp)

राज्यातील भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भिवंडीत कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजन करण्यात आले आहे. त्या शिबिराला केंद्रीय मंत्र्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यापर्यंत झाडून सर्व नेतेमंडळी उपस्थित आहेत. मात्र, मुंडे भगिनींची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत आहे, त्यामुळे या दोघींच्या गैरहजेरीबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असते. त्या आपल्या परीने त्याचे खंडनही करत असतात. मात्र, भाजपमधील वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे या पक्षाच्या महत्वाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहतात आणि पुन्हा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू होते. तसेच, त्यांच्या पक्षांतराच्याही वावड्या उठत असतात.

मागील काही दिवसांपूर्वी त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी त्यांनी पुढे येत आपण कुठेही जाणार नाही. आपण काही दिवस विश्रांती घेऊ इच्छित आहे, असे त्यांनी नमूद केले होते. राजकीय घडामोडींपासून आपण काही दिवस अलिप्त राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे आवताण कायम द्यायचे. मात्र, आतापर्यंत त्यांनी शिवसेना प्रवेशाबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, मध्यंतरी त्यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यांचे काही व्यक्तीगत प्रश्न राहू शकतात : चंद्रशेखर बावनकुळे

याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी माझं काल बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितलं की आजच्या बैठकीला मी येऊ शकणार नाही. त्यांनी भाजपच्या महाविजयचे काम सुरू केले आहे. मोदी@९ हे काम बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यांचे काही व्यक्तीगत प्रश्न राहू शकतात. त्यांच्या बहिणीच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्या आज आल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT