Mumbai News : पहलगामध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात असंतोष पसरला आहे. भारतानं या हल्ल्यानंतर कडक पावलं उचलत पाकिस्तानची मोठी कोंडी केली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी केलेल्या उलट-सुलट विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच नेहमीच वादग्रस्त विधानं करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर पहिल्यांदाच मोठं विधान केलं आहे.
सपाचे आमदार अबू आझमी यांनी सोमवारी(ता.28) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर मोठं भाष्य केलं आहे. तब्बल 26 जणांनी निरपराध पर्यटकांनी जीव गमावलेल्या आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी,माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यानंतर आता पहिल्यांदाच सपा नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अबू आझमी म्हणाले, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या, कारण त्यांना हे चांगलं माहीत होतं की, असं केलं तर भारतामध्ये हिंदू -मुस्लीम होईल.पण ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्यावेळी तेथील मुस्लिम बांधव बचावासाठी धावून आले,मदत कार्य केलं. मात्र, भारतातील मुसलमान लोकांना अशी वागणूक का दिली जात आहे? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काश्मीरच्या पहलगाममध्ये जे झालं त्यावर सगळेच मुस्लीम ओरडून सांगत आहेत,आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारने या दहशतवाद्यांविरोधात कठोर ॲक्शन घ्यावी.ज्यांनी हिंदूंना मारले त्यांना मारा आम्हाला का त्रास देत आहात? मुंबईच्या दादरसह भारतात अनेक ठिकाणी मुस्लीम लोकांना मारहाण केली जात असल्याचा गंभीर आरोपही अबू आझमींनी यावेळी केला आहे.
यावेळी अबू आझमींनी भाजप आमदार नितेश राणेंवर टीकेची झोड उठवली.ते म्हणाले,पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे निवडून आलेले आमदारही धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करत आहेत. तसेच नितेश राणे हे संविधानाची शपथ घेऊन नितेश राणे रत्नागिरीत जाऊन हनुमान चालीसा वाचायला सांगत आहेत. हिंदू मुस्लीम असा द्वेष करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
तसेच अबू आझमींनी यावेळी मी पंतप्रधान ,केंद्र आणि राज्य सरकार,मोहन भागवत यांच्यासह सर्वांना विनंती करतो की, जातीयवाद होऊ देऊ नका.यासंदर्भात एक पत्रक काढून आदेश देण्याची गरज आहे. आपण याआधीही दोनवेळा नितेश राणे यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि पत्रसुध्दा दिले होते. पण आता पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असून त्यांना राणेंबाबत कारवाईचं पत्र देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी अबू आझमी म्हणाले,सरकार ज्या गोष्टी आणत आहेत, त्या सगळ्या मुस्लिम विरोधात आहेत. वक्फ बोर्ड कायदा तोही मुसलमान विरोधात आहे, तो आम्हाला नको आहे.सगळे हिंदू-मुस्लिम यांना लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,अशी टीकाही यावेळी आमदार अबू आझमींनी यावेळी केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे.
ते म्हणाले,अशाप्रकारे तुम्ही भारताच्या भूमीवर येऊन हल्ला करता.धर्म विचारुन गोळ्या चालवल्या.तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात? तुम्ही तर ISIS सारखं काम केलं आहे” असं त्यांनी पाकिस्तानला सुनावलं.मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो,काश्मीर आमचं अभिन्न अंग असूनतिथले काश्मिरीही आमचं अभिन्न अंग आहेत.आपण त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाही” अशा शब्दांत ओवैसी यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.