India-France Deal: भेदरलेल्या पाकिस्तानला आणखी घाम फुटणार; भारतानं फ्रान्ससोबत केला मोठा करार; नौदलाच्या ताफ्यात खतरनाक विमानाची एन्ट्री?

Rafale Marine Fighter Jet Deal : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
India-France Deal.jpg
India-France Deal.jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत.या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच भारतानं युध्दाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्या तीनही दलांना सतर्क राहण्याचे आदेश देतानाच संरक्षणयंत्रणा अधिक मजबूत करण्यावरही मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. यातच आता आणखी भारताचं (India) बळ आणखी वाढलं आहे.

पहलगामममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं मोठा निर्णय घेतला असून आता नौदलासाठी 26 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहे.याबाबत फ्रान्ससोबत 63 हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातील 22 विमाने ही सिंगल सिटर असून अन्य दोन विमाने दोन आसनी प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी आहेत.ही विमाने 2031 च्या अखेरपर्यंत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

केंद्र सरकारने नुकतीच नौदलासाठीचे जगातील सर्वाधिक अत्याधुनिक लढाऊ विमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘राफेल-एम’च्या खरेदीला मंजुरी दिली होती. ही विमानं फक्त फ्रान्सच्या नौदलाच्या ताफ्यातच आहे. या करारावर शिक्कामोर्तब करताना संरक्षण खात्याचे सचिव राजेशकुमार सिंह,नौदलाचे उपप्रमुख ॲडमिरल के. स्वामीनाथन हे यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

India-France Deal.jpg
Maratha Reservation: जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश; मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची अपडेट; शिंदे समितीकडून चौथा अहवाल सादर

भारत आणि फ्रान्स सरकार यांच्यात ‘राफेल-एम’ विमान खरेदीच्या अनुषंगाने थेट करार झाला आहे. ‘मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये 2016 मध्ये भारताने फ्रान्सकडून 36 राफेल विमानांची खरेदी केली होती. सध्या ही विमाने हवाई दलाच्या अंबाला आणि हाशिमारा हवाईतळावर तैनात आहेत. या विमानांच्या खरेदीवरुन मोठा वादही निर्माण झाला होता.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या बैठकीत ‘राफेल -एम’ विमाने खरेदी करण्याच्या अनुषंगाने नियमांत आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या होत्या.ही बैठक 2024 च्या सप्टेंबर महिन्यात पार पडली होती. सध्या नौदलाच्या ताफ्यात 40 ‘मिग 29 - के’ ही विमाने आहेत.

India-France Deal.jpg
Bharati Lad : पतंगराव कदमांच्या कन्या 'भारती लाड' यांचं निधन; विश्वजीत कदमांचं मायेचं छत्र हरपलं

रशियाकडून ‘मिग 29 - के’ या विमानांची सुमारे 2009 पासून खरेदी केली जात होती. मात्र, ही विमाने जुनी झाल्याने त्याजागी राफेल-एम विमानांची तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संरक्षणखात्याकडून घेण्यात आला होता.

आयएनएस विक्रांत,आयएनएस विक्रमादित्य यासारख्या लढाऊ जहाजांवर राफेल- एम’ तैनात असणार आहे. या विमानांबाबतची महत्त्वाची बाब म्हणजे फ्रान्सची ‘डसॉल्ट एव्हिएशन’ नावाची कंपनी राफेल विमानांची निर्मिती करते.या विमानांची देखभाल, लॉजिस्टिक सपोर्ट, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याची जबाबदारी फ्रान्स सरकारची असणार आहे.या विमानांचे सुटे भाग आणि उपकरणांची निर्मिती भारतात होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com