
Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारताना राज्याचं राजकारण तापवलं होतं. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या जरांगेंच्या मागणीवरुन महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी टोकाचा संघर्ष पेटला होता. या समितीनं सरकारकडून देण्यात आलेली मुदतवाढ संपण्याआधीच मोठी मोहीम फत्ते केली आहे.
त्यानंतर राज्य सरकारनं दोन्ही समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची कुणबी नोंदी शोधून काढण्यासाठी नियुक्ती केली होती. आता याच समितीनं मंत्रालयात चौथा अहवाल नुकताच सादर केला असून त्यात 58 लाख 82 हजार 365 मराठा कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत.
राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आतापर्यंत विविध गॅझेट्स आणि कागद नोंदीचा तपास करुन 58 लाख 82 हजार 365 मराठा कुणबी नोंदी शोधल्या आहेत. या नोंदींचा लाभ तब्बल २ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येऊ नयेत याच हेतूनं शिंदे समिती नेमली होती.
न्या.शिंदे समितीच्या या नोंदींच्या आधारे आत्तापर्यंत तब्बल 8 लाख 25 हजार 851 लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचा ओबीसी (OBC) अर्थात इतर मागासवर्गात समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे न्या. शिंदे समितीला सरकारकडून ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
राज्य सरकारच्या शिंदेसमितीनं कुणबी नोंदीविषयीचा नुकताच चौथा अहवाल मंत्रिमंडळाकडे सादर केला आहे.हैदराबाद गॅझेटिअर्स तसेच बॉम्बे आणि सातारा गॅझेटिअर्समधील नोंदींचाही या समितीकडून शोध घेण्यात आला आहे. आतापर्यंत समितीला सापडलेल्या नोंदींपैकी अमरावती विभागात सर्वाधिक 25 लाख 74 हजार 369 नोंदी सापडल्या आहेत.तर सर्वात कमी लातूरमध्ये 984 नोंदी सापडल्या आहेत.
कुणबी मराठा नोंदी पडताळणाऱ्या शिंदे समितीचं काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हैदराबाद,बॉम्बे तसेच सातारा गॅझेटिअर्सचा शोधही आता संपत आला असून ही समिती जून महिन्यात राज्य सरकारकडे अंतिम अहवाल सादर करणार आहे.
अमरावती 25,74,369
कोकण 8,25,247
पुणे 7,2,513
नाशिक 8,27,465
नागपूर 9,4,976
छत्रपती संभाजीनगर 47,795
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.