Nitesh Rane-Sanjay Raut-Aditya Thackeray-Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे वरळी सोडणार, मुंबईतील सुरक्षित ‘या’ मतदारसंघावर डोळा; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Vijaykumar Dudhale

Mumbai, 16 August : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना उद्देशून हा पिंक सरडा बारामती सोडून चालला आहे, असे विधान केले होते. त्याचा समाचार घेताना भाजप आमदार नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरे हेच वरळी मतदारसंघ सोडून चालले आहेत.

आता त्यांचा डोळा सुरक्षित असणाऱ्या शिवडी मतदारसंघावर आहेत. राहुल गांधींप्रमाणेच आदित्य ठाकरे महाराष्ट्रात सुरक्षित वायनाड शोधत आहेत, असा गौप्यस्फोटही नीतेश राणे यांनी केला.

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा उल्लेख ‘पिंक सरडा’ असा केला होता. आता हा पिंक सरडा बारामती सोडून चालला आहे, असं मी ऐकलं आहे. कुठं जाणार आहे, हे मला माहिती नाही, अशी टीका अजित पवारांवर केली होती. त्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

राणे म्हणाले, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या रक्तात भिनलेले आहे.

अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढवणार की दुसरीकडून निवडणूक लढवणार, हे थोड्या दिवसांत कळेलच. पण संजय राऊत यांना मी विचारेन की तुमच्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे अजून किती शिवसैनिकांचे राजकीय बळी घेणार आहेत.

पहिलं सुनील शिंदेंना वरळीतून संपवलं. सचिन अहीर यांना विधान परिषद देऊन बाजूला केलं. आता आदित्य ठाकरेंचा डोळा हा शिवडी विधानसभा मतदारसंघावर आहे. कारण वरळी विधानसभेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेली पीछेहाट, अवघ्या चार ते पाच हजारांचे मिळालेले मताधिक्य, त्यामुळे तुमच्या मालकांचा मुलगा महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या सारखे वायनाड शोधत आहेत, असा दावाही राणेंनी केला.

वरळीच्या जनतेने तुमच्या आदित्य ठाकरे यांना घरी बसविण्याचे ठरवलेले आहे. म्हणून संजय राऊतांनी अजितदादांची चिंता करण्याअगोदर आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणूक लढवणार आहेत का? की दुसरीकडे जाणार आहेत. या प्रश्नाचे उत्तर पहिले द्यावे मगच बारामतीबद्दल तोंड उघडा, असे आव्हान नीतेश राणे यांनी संजय राऊत यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT