Eknath Shinde  sarkarnama
मुंबई

Shiv Sena new project: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 'हा' उपक्रम आता शिवसेनाही राबविणार; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी घोषणा

Ajit Pawar initiative News : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती म्हणूनच आपण एकत्र लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sachin Waghmare

Mumbai News : शिवसेना मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक गुरुवारी दुपारी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी सर्व शिवसेना मंत्र्यांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती म्हणूनच आपण एकत्र लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा आपल्याला महाविजय मिळवायचा असेल तर एकजुटीने पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यापुढील कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेना (Shivsena) मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवन येथे बसून जनता दरबार घेण्याचे आदेश शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरविण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाच्या मंत्र्यांना दिले आहेत.

राज्यातील सर्व जिल्हा शिवसेना पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांशी सर्व मंत्र्यांनी संपर्क ठेवून त्या ठिकाणच्या समस्या सोडवायच्या आहेत, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवरील नेतेमंडळींशी संपर्क ठेवून काम केल्यास त्याचा फायदा होईल, असेही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT