Ajit Pawar, Eknath Shinde , Manoj Jarange  sarkarnama
मुंबई

Ajit Pawar on Eknath Shinde : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शपथ खरी करून दाखवली', अजित पवारांनी केले कौतुक

Roshan More

Maratha Reservation : 'सगेसोयरे' शब्दावर तोडगा काढून राज्य सरकाने 'जीआर' काढला. हा 'जीआर' मान्य करत मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन स्थगित केले. मनोज जरांगे यांनी वाशीतील सभेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. त्यांनी मनोज जरांगे यांना 'जीआर' सुपूर्द केला. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ खरी करून दाखवली. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी कष्ट घेतले. मेहनत घेतली.मी सुद्धा याच विचारांचा आहे. सर्वांना मान्य होईल असा चांगला मार्ग यातून काढला, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. (Ajit Pawar on Eknath Shinde)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांनी कष्ट घेतले. सातत्याने चर्चा करून मार्ग काढला.मी समाधान व्यक्त करतो, असे देखील अजित पवार म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले आहे. जरांगेंच्या आंदोलनावर चांगला मार्ग निघाला. सगळ्या समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने केला. ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गुन्हे मागे घेणार नाही...

मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या आंदोलन तसेच नंतर झालेल्या आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. यावर सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आंदोलनात गंभीर प्रकारचे कृत्य करणे, घरे जाळणे, हल्ला करणे असा स्वरुपाचे गुन्हे न्यायालयाच्या परवानगी शिवाय मागे घेत येत नाही, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT